पाच हजाराच्या मोबाईलसाठी दगडाने डोके ठेचून खूनाचा प्रयत्न; गुन्हा करून ३ मुले पोलिसात हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 17:08 IST2022-06-29T17:08:35+5:302022-06-29T17:08:45+5:30

जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाच्या कवटीला क्रॅक गेला असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु

Attempted murder by crushing head with a stone for five thousand mobiles; 3 children present in police after committing crime | पाच हजाराच्या मोबाईलसाठी दगडाने डोके ठेचून खूनाचा प्रयत्न; गुन्हा करून ३ मुले पोलिसात हजर

पाच हजाराच्या मोबाईलसाठी दगडाने डोके ठेचून खूनाचा प्रयत्न; गुन्हा करून ३ मुले पोलिसात हजर

धनकवडी : मोबाईलच्या व्यवहारातून तीन अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याच्या खूनचा प्रयत्न केला. यामध्ये जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाच्या कवटीला क्रॅक गेला आहे. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. रोहन प्रशांत डोईफोडे (वय १६ रा. नऱ्हे) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रोहनच्या ओळखीच्या असलेल्या अल्पवयीन मुलांपैकी एकाने त्याच्याशी मोबाईल संदर्भात व्यवहार केला होता. हा व्यवहार फक्त पाच हजाराचा होता. व्यवहार फिस्कटल्याने त्या तीघांनी रोहनला आंबेगाव खुर्द येथील शिल्प सिध्दी इमारतीच्या मागील मोकळ्या जागेत नेले. तेथे त्याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्या नंतर ते थेट पोलीस ठाण्यात आले. त्यांनी रोहनला मारहाण केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रोहनला उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे करत आहेत.

Web Title: Attempted murder by crushing head with a stone for five thousand mobiles; 3 children present in police after committing crime