शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा पोलीस ठाण्यातच पेटवून घेण्याचा प्रयत्न; पोलिसांवर नाराज तरुणाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 10:27 IST

संबंधित बारमालकाकडून पोलीस दर महिन्याला ठराविक रक्कम घेत होते. मात्र मागील २ महिन्यांपासून रक्कम वाढवून देण्यात यावी यासाठी पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचे तरुणाचे म्हणणे आहे

किरण शिंदे

पुणे: पोलीस सहकार्य करत नसल्याच्या कारणावरून एका तरुणाने वाघोली पोलीस चौकीच्या बाहेरच स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केलेली घटना ताजी असताना चक्क आता एका तरुणाने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यातच पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. 

बारमालकाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला वेळीच रोखल्याने दुर्घटना टळली. सोमवारी दुपारच्या सुमारास लोणीकंद पोलीस स्टेशनच्या आवारात ही घटना घडली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सत्यम गावडे या तरुणाचा वाघोली परिसरात बार आहे. नियमानुसार रात्री दीड नंतर बार बंद करणे आवश्यक आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत बार सुरू असल्याचे सांगून महिनाभर बार बंद ठेवावा लागेल असे लोणीकंद पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे.  पोलीस आयुक्तांचे आदेश आहेत. त्यामुळे बार बंद ठेवावा लागेल असे म्हणत या महिला अधिकाऱ्याने दमदाटी केली असा आरोप सत्यम गावडे या तरुणाने केला. मात्र बार बंद ठेवले तर आर्थिक नुकसान होईल या भीतीने या तरुणाने पोलीस स्टेशनच्या बाहेरच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच रोखल्याने दुर्घटना टळली. दरम्यान या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ या तरुणाच्या मित्रांनी मोबाईल मध्ये काढले होते. मात्र पोलिसांनी मोबाईल जप्त करून हे सर्व व्हिडिओ डिलीट करण्यास भाग पाडल्याचा आरोपही या तरुणाने केलाय. 

दरम्यान संबंधित बारमालक तरुणाकडून पोलीस दर महिन्याला ठराविक रक्कम घेत होते. मात्र मागील दोन महिन्यांपासून रक्कम वाढवून देण्यात यावी यासाठी पोलिसांकडून त्रास दिला जात होता असे त्या तरुणाचे म्हणणे आहे. त्याने रक्कम वाढवून देण्यास नकार दिल्याने पोलिसांनी त्रास देण्यास सुरुवात केला. रात्री अपरात्री येऊन दुकानातील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणे, खटले दाखल करणे, हॉटेल बंद करण्याची धमकी देणे असे प्रकार मागील दोन महिन्यांपासून सुरू होते. १ एप्रिलच्या रात्री संबंधित महिला अधिकारी त्याच्या दुकानात आल्या. बंद असलेल्या शटर उघडण्यास भाग पाडलं आणि रात्री दोन नंतरही बार सुरू ठेवतो का असे म्हणत हॉटेल बंद करण्याची धमकी दिली असल्याचे या तरुणाने सांगितले.

टॅग्स :Puneपुणेwagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसाArrestअटक