शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत पत्रकारांना लुटण्याचा प्रयत्न फसला

By admin | Updated: September 23, 2015 03:31 IST

‘ए गाडी बाजूला घे... धडक मारून पुढे जातोस... चल नुकसान भरून दे... गाडीतून खाली उतर ...’ असा बनाव रचून सोमवारी (दि. २२) रात्री १० वाजता कारमधील पत्रकारांनाच लुटण्याचा प्रयत्न टोळीने केला.

बारामती : ‘ए गाडी बाजूला घे... धडक मारून पुढे जातोस... चल नुकसान भरून दे... गाडीतून खाली उतर ...’ असा बनाव रचून सोमवारी (दि. २२) रात्री १० वाजता कारमधील पत्रकारांनाच लुटण्याचा प्रयत्न टोळीने केला. पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ते पळून गेले. मात्र, बारामती शहरातील इंदापूर चौक ते इंदापूर रस्त्याच्या टोलनाक्यापर्यंत सायंकाळी सातनंतर गाड्या अडवून लुटणारी टोळी सक्रिय आहे. याच प्रकारे बनाव रचून ही टोळी अनेकांना लुटत असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करून बसस्थानक, रिंगरोडच्या परिसरात होत असलेल्या चोऱ्यांवर लक्ष केंद्रित केले. मात्र, पोलिसांच्या हतबलतेचा फायदा घेऊन ही टोळी गाड्या अडवून वाटमारी करत आहेत. येथील पत्रकार अमोल तोरणे यांच्यासह काही जण सोमवार (दि.२१) इंडिका कारमधून भवानीनगरच्या दिशेने निघाले होते. त्यांना हा अनुभव आला. सोमवारी रात्री बारामती-इंदापूर रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे दुचाकीस्वाराने कारचा पाठलाग सुरू केला. हॉर्न वाजवतोय... ऐकू येत नाही का... अशी बतावणी करून त्याने सर्वांना दमबाजी सुरू केली. त्यानंतर याबाबत शहानिशा करण्यासाठी पत्रकारांनी कार रस्त्याच्या कडेला घेतली. या वेळी दुचाकीस्वाराने, ‘तुमच्या कारने माझ्या दुचाकीला धडक दिली आहे. त्यामध्ये माझ्या गाडीचे नुकसान झाले’ असे सांगून दमबाजी सुरूच ठेवली. या वेळी पत्रकार तोरणे यांनी दुचाकीचे निरीक्षण केले. तसेच, गाडीचा वेग नियंत्रित असल्याचे त्यांना माहिती होते. त्यामुळे बनाव रचून पैसे लुटण्याचा दुचाकीस्वाराचा डाव त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने मोबाईलवरून पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधला. काहीही घडले नसताना खोटे बोलून गाड्या अडवून लुटले जात असल्याची माहिती दिली.