पाचशे रुपये न दिल्याने कोयत्याने दुकानदारावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 17:22 IST2021-03-15T17:21:15+5:302021-03-15T17:22:14+5:30

विश्रांतवाडी पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक

Attempt to kill the shopkeeper with a scythe for not paying five hunded rupees | पाचशे रुपये न दिल्याने कोयत्याने दुकानदारावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

पाचशे रुपये न दिल्याने कोयत्याने दुकानदारावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देजीवे मारण्याचा प्रयत्न करून लोकांच्या मनात निर्माण केली दहशत

पाचशे रुपये देण्यास नकार दिला म्हणून रंगकाम करणाऱ्या व्यक्तीने एका दुकानदारावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 
ही घटना कळस येथील शांती हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल्स येथे रविवारी दुपारी एक वाजता घडली.

विश्रांतवाडी पोलिसांनी विनोद उत्तम पवार (वय ३५, रा. कळस) याला अटक केली आहे. याप्रकरणी संजय लक्ष्मण गोयल (वय २८, रा. विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोयल यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. पवार हा पेंटिगचा व्यवसाय करत असून तो गोयल यांचा नियमितचा ग्राहक आहे. दोघेही एकमेकांच्या परिचयाचे आहेत. रविवारी सकाळी पवार हा गोयल यांच्या दुकानात आला व त्याने खर्चासाठी ५०० रुपयांची मागणी केली. मात्र गोयल यांनी धंदा झाला नसल्याचे सांगून पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग येऊन पवार याने गोयल यांना तुझा जीवच घेतो, असे म्हणून निघून गेला. त्यानंतर तो कोयता घेऊन पुन्हा आला. गोयल यांच्या मानेवार कोयत्याने वार करुन ज्यांना जखमी केले. तसेच त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या मनात दहशत निर्माण केली. पवार हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पोलीस उपनिरीक्षक एल़ आऱ सातपुते अधिक तपास करीत आहेत.
 

 

Web Title: Attempt to kill the shopkeeper with a scythe for not paying five hunded rupees