वडिलांकडून पोटच्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न; १९ वर्षीय मुलगी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 13:08 IST2021-07-29T13:05:12+5:302021-07-29T13:08:49+5:30
खेड तालुक्याच्या खरपुडी मधली घटना; घटनेनंतर पती फरार

वडिलांकडून पोटच्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न; १९ वर्षीय मुलगी गंभीर जखमी
राजगुरुनगर: किरकोळ कारणावरून पोटच्या मुलीला जीवे मारण्याच्या प्रयत्न वडिलांनी केला आहे. हि घटना खेड तालुक्याच्या खरपुडी येथे घडली आहे. या घटनेत १९ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. याबाबत पत्नी निर्मला राजाराम गायकवाड (वय ३९. )रा. खरपुडी (ता.खेड ) यांनी खेड पोलिस ठाण्यात पती राजाराम दगडु गायकवाड रा. खरपुडी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर पती फरार झाला आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांच्या राहत्या घरात वडिल राजाराम गायकवाड यांने १९ वर्षीय मुलीला भजी करण्यास सांगितले होते. मात्र घरात तेल नसल्याने वडिलांना भजी करुन दिली नाहीत. त्याचा राग मनात धरुन तीचे वडिल राजाराम गायकवाड यांनी तीला विटेने डोक्यात मारुन काठीने दोन्ही हातावर व हाताचे बोटावर मारुन गंभीर दुखापत केली आहे. या घटनेने पत्नीने पती राजाराम गायकवाड यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटनेनंतर गायकवाड फरारी झाला असुन पुढील तपास पोलिस हवालदार सचिन गिलबिले करत आहे.