शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 25, 2015 23:26 IST

घरगुती भांडणातून सासरा व पतीने विवाहितेला रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी कनेरसर

राजगुरुनगर : घरगुती भांडणातून सासरा व पतीने विवाहितेला रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी कनेरसर (ता. खेड) येथे घडली. या दुर्घटनेत विवाहित महिला ९० टक्के भाजली असून, तिला भोसरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी तिचा सासरा व पतीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही. शकुंतला विठ्ठल दौंडकर (वय २८ वर्षे, रा. दरावस्ती, कनेरसर, ता. खेड) असे या पीडित विवाहित महिलेचे नाव आहे. तिचा सासरा आणि पती वारंवार दारू पिऊन शिवीगाळ करत असत आणि मारहाणही करत असत. मंगळवारी ती स्वयंपाक करीत असताना सासऱ्याने तिला ‘तू मला शिळ्या भाकरीचे तुकडे खायला देते’ असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. शेवटी त्याने मागून येऊन रॉकेलचे कॅन तिच्या अंगावर ओतले. सासऱ्याने शकुंतला हिच्या अंगावर रॉकेल टाकल्यावर तिच्या नवऱ्याने पेटवून दिले. नवरा विठ्ठल दौंडकर याने तिला, पोलिसांना कळविले तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली. पोलिसांनी दोघांवरही भा.दं.वि. कलम ३०७,३२३, ५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)