Pune: कापड दुकानात हल्लेखोर शिरले; व्यापाऱ्यावर वार करून पळाले! लष्कर भागातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 09:16 IST2023-12-04T09:16:21+5:302023-12-04T09:16:38+5:30

पुणे : लष्कर भागात सेंटर स्ट्रीट परिसरातील कापड दुकानात शिरून दोघांनी व्यावसायिकांवर कोयत्याने वार केले. हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी ...

Attackers enter cloth shop; Run away after stabbing the merchant! Incidents in the army area | Pune: कापड दुकानात हल्लेखोर शिरले; व्यापाऱ्यावर वार करून पळाले! लष्कर भागातील घटना

Pune: कापड दुकानात हल्लेखोर शिरले; व्यापाऱ्यावर वार करून पळाले! लष्कर भागातील घटना

पुणे : लष्कर भागात सेंटर स्ट्रीट परिसरातील कापड दुकानात शिरून दोघांनी व्यावसायिकांवर कोयत्याने वार केले. हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यामागचे निश्चित कारण पोलिसांना समजले नाही.

विजय विमलचंद मेहता (वय ३८, रा. युनिव्हर्सल अपार्टमेंट, लष्कर) असे गंभीर झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत मेहता यांचा भाऊ मनोज मेहता यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मेहता बंधूंचे सेंटर स्ट्रीटवर ‘स्टेप इन’ कपडे विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास दोनजण दुकानात शिरले. त्यांनी विजय यांच्यावर कोयत्याने वार केले. विजय गंभीर जखमी झाले. हल्लेखोर दुकानातून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिस ठाण्यातील पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक प्रियंका शेळके तपास करत आहेत.

Web Title: Attackers enter cloth shop; Run away after stabbing the merchant! Incidents in the army area