कोंढव्यात राष्ट्रवादीचा प्रचार केल्याने तरुणावर हल्ला; अज्ञातांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 11:15 PM2019-10-30T23:15:42+5:302019-10-30T23:23:48+5:30

या वेळी आजू बाजूला मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. पण कोणीही पुढे झाले नाही

Attack on youth by propagating NCP Candidate in Kondhwa Pune | कोंढव्यात राष्ट्रवादीचा प्रचार केल्याने तरुणावर हल्ला; अज्ञातांवर गुन्हा दाखल

कोंढव्यात राष्ट्रवादीचा प्रचार केल्याने तरुणावर हल्ला; अज्ञातांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केल्याच्या कारणावरुन ८ जणांनी तरुणावर हल्ला करण्यात आला आहे.
सुमित बाबर (वय ३७, रा. कोंढवा खुर्द) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना कोंढव्यातील महादेव बाबर यांच्या कार्यालयाजवळ रात्री आठ वाजता घडली. सुमित बाबर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. 

याबाबतची माहिती अशी, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे यांनी विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांचा पराभव केला. सुमित बाबर हे एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी करतात. त्यांनी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला होता. त्या कारणावरुन बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ७ ते ८ जणांनी सुमित बाबर याला ओढून रस्त्यावर आणले व काठी व दांडक्याने बेदम मारहाण केली. या वेळी आजू बाजूला मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. पण कोणीही पुढे झाले नाही. सुमित रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. यामुळे कोंढवा भागात काही काळ तणाव निर्माण झाला. 

सुमित बाबर याला जखमी अवस्थेत जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तेथे त्याच्या डोक्यावर १७ टक्के घालण्यात आले. त्याचा हातही फॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.  या घटनेची माहिती समजताच कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असून आरोपी निष्पन्न झाले आहेत.  रात्री उशिरापर्यंत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. याबाबत आमदार चेतन तुपे यांनी सांगितले की, आज नवनिर्वाचित आमदारांची बैठक असल्याने मी मुंबईला आलो आहे. या घटनेची माहिती मला समजली. लोकशाहीमध्ये सर्वांना आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. या समाजकंटकांवर कारवाई झाली पाहिजे.

Web Title: Attack on youth by propagating NCP Candidate in Kondhwa Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.