पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 15:19 IST2020-05-04T15:11:07+5:302020-05-04T15:19:27+5:30
अज्ञात तरुणांनी वार करून केले पलायन

पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार
पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील वडगांव बुद्रुक येथील तुकाई नगर भागात एका महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्याची घटना सोमवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली आहे.मोनिका राम मदने ( वय ३०, रा. तुकाई नगर, वडगांव बुद्रुक, पुणे) असे जखमी महिलेचे नाव असून उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घरापासून जवळच बाहेरच्या बाजूला बसलेल्या मोनिकावर अज्ञात तरुणांनी डोक्यात, मानेवर धारधार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर कुत्र्यांचा भुंकण्याच्या आवाजाने शेजारील महिलांनी पाहिले असता मोनिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. दरम्यान, काहींनी त्यांच्या पतीला याबाबत माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पत्नीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके व कर्मचारी पोहचले असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.