मेडिकलमधून कंडोम आणण्यास दिला नकार,अल्पवयीन मुलाच्या गळ्यावर केला वार; पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 19:37 IST2021-08-05T19:35:46+5:302021-08-05T19:37:27+5:30
अल्पवयीन मुलाला पैसे देऊन मेडिकलमधून कंडोम घेऊन येण्यास सांगितले. मात्र मुलाने त्याला नकार दिला...

मेडिकलमधून कंडोम आणण्यास दिला नकार,अल्पवयीन मुलाच्या गळ्यावर केला वार; पुण्यातील घटना
पुणे : मेडिकलमध्ये जाऊन आजही गर्भनिरोधक विकत घेण्यास अनेक जण कचरतात. कोणी नाही हे पाहून दुकानात जाऊन त्याची मागणी करतात. खराडी परिसरातील थिटे वस्तीत एका अल्पवयीन मुलाने मेडिकलमधून कंडोम आणून देण्यास नकार दिल्याने त्याच्या गळ्यावर वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी निलेश वाघमारे (वय २१, रा. थिटे वस्ती, खराडी) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तुकारामनगर येथील एका १७ वर्षाच्या मुलाने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी अल्पवयीन मुलगा हा त्याच्या मित्राला भेटण्यासाठी ३ ऑगस्ट रोजी थिटेवस्ती परिसरात गेला होता. त्यावेळी निलेश याने अल्पवयीन मुलाला पैसे देऊन मेडिकलमधून कंडोम घेऊन येण्यास सांगितले. मात्र मुलाने त्याला नकार दिला. त्यामुळे निलेश याने चिडून मुलाला शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरूवात केली. ‘माझे काम तू ऐकत नाही काय थांब आता तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणत तेथे असलेल्या वडापावच्या दुकानामधील चाकू घेऊन येऊन मुलाच्या गळ्यावर वार करून जखमी केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल जाधव करत आहेत.