संपत्ती बळकावण्यासाठी गे पार्टनरवर केला हल्ला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 02:18 IST2018-09-23T02:18:38+5:302018-09-23T02:18:54+5:30
समलैंगिक पार्टनवर गाढ झोपेत असताना कोयत्याने वार करून ठार त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी एकास अटक केली. पार्टनरची संपत्ती बळकावण्यासाठी हा हल्ला झाला आहे का? याचा तपास पोलीस करीत आहे.

संपत्ती बळकावण्यासाठी गे पार्टनरवर केला हल्ला?
पुणे : समलैंगिक पार्टनवर गाढ झोपेत असताना कोयत्याने वार करून ठार त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी एकास अटक केली. पार्टनरची संपत्ती बळकावण्यासाठी हा हल्ला झाला आहे का? याचा तपास पोलीस करीत आहे.
या प्रकरणी पाषाण सुस रस्त्यावर राहत असलेल्या २३ वर्षीय व्यक्तीस खडक पोलिसांनी अटक केली. याबाबत ४६ वर्षीय पार्टनरने फिर्याद दिली आहे.
१९ सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास शुक्रवार पेठेत हा प्रकार घडला. फिर्यादी तरुणाचे दुचाकीचे शोरुम आहे़ त्याचा शुक्रवार पेठेत आलिशान बंगला आहे. तर, आरोपी हा काहीही कामधंदा करीत नसून त्याचा दुसरा गे मित्र त्याचा सांभाळ करतो़ या दोघांची सुमारे ३ वर्षांपूर्वी गे डेटिंग साईटच्या माध्यमातून भेट झाली होती़ तेव्हापासून दोघेही एकमेकाबरोबर अधूनमधून राहतात़ आरोपीला फिर्यादी यांची संपत्ती हडपण्यासाठी कोणी फूस लावली आहे का, याबाबत पोलिसांनी त्याकडे तपास केला. मात्र आरोपी हा चलाख व धूर्त असल्याने त्याने काहीच माहिती सांगितली नाही, असे पोलिसांनी न्यायालयास सांगितले.
वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, फिर्यादी यांच्यावर हल्ला करण्यामागे नेमका काय हेतू होता?, गुन्ह्यातील हत्यार त्याने कोठून आणले याचा तपास करण्यासाठी आरोपीला कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार तरुणाच्या पोलीस कोठडीत
२५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.