माणमध्ये भांडणाच्या रागातून चुलत्याने केला पुतण्यावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 19:59 IST2018-04-07T19:59:33+5:302018-04-07T19:59:33+5:30

दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चुलत्यानेच पुतण्यावर कुऱ्हाडीने वार करीत जीवघेणा हल्ला चढविल्याचा प्रकार शुक्रवारी (दि ६) रात्री अकराच्या सुमारास घडला.

attack on brothers son with qurral incident anger at maan | माणमध्ये भांडणाच्या रागातून चुलत्याने केला पुतण्यावर जीवघेणा हल्ला

माणमध्ये भांडणाच्या रागातून चुलत्याने केला पुतण्यावर जीवघेणा हल्ला

ठळक मुद्देडोक्यात, तोंडावर, कपाळावर गंभीर वार

वाकड : दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चुलत्यानेच पुतण्यावर कुऱ्हाडीने वार करीत जीवघेणा हल्ला चढविल्याचा प्रकार शुक्रवारी (दि ६) रात्री अकराच्या सुमारास घडला. सतीश अशोक भोईर (वय २७, रा. भोईरवाडी, माण) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर हिंजवडीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हल्लेखोर सोपान पंढरीनाथ भोईर (वय ४५, रा. भोईरवाडी, माण) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्वाती काशिनाथ भोईर (वय ४०, रा. भोईरवाडी, माण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सतीश व आरोपी यांच्यात किरकोळ करणावरून दोन दिवसांपूर्वी भांडणे झाले होते. याचा राग मनात धरून शुक्रवारी सतीश घरात झोपलेला असताना आरोपीने त्याच्यावर धारधार कुऱ्हाडीने हल्ला चढविला. त्यात त्याच्या डोक्यात, तोंडावर, कपाळावर गंभीर वार करण्यात आले आहेत. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. 

Web Title: attack on brothers son with qurral incident anger at maan