शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कुरुलकर याने परदेशात जाऊन पाकिस्तानी हेरांच्या भेटी घेतल्याचा ATS ला संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 13:49 IST

कुरुलकर याने देशाच्या सुरक्षेला बाधा आणणारे काही छायाचित्रे पाकिस्तानच्य ईमेल पाठवल्याचा संशयदेखील तपास यंत्रणेला आहे

पुणे : ‘डीआरडीओ’चे संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकर याला पाकिस्तानातून आलेल्या ई-मेलचा सखोल तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. कुरुलकर याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेरांना संवेदनशील माहिती तसेच छायाचित्रे ई-मेलद्वारे पाठवल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. राज्य दहशतवादविरोधी विभागाच्या (एटीएस) कोठडीत असलेल्या कुरुलकरची चौकशी सुरू आहे.

कुरुलकरला अटक करण्यात आल्यानंतर एटीएसकडून करण्यात आलेल्या तपासाबाबतचा माहिती अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. कुरुलकरकडे सखोल तपास करायचा असून, कुरुलकर याच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती एटीएसकडून करण्यात आली होती. त्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी कुरुलकरवर ठेवण्यात आलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे, असे निरीक्षण नोंदवून पोलिस कोठडीत १५ मेपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

कुरुलकरला पाकिस्तानातून काही ई-मेल पाठवण्यात आले आहेत. या ई-मेलला प्रतिसाददेखील दिलेला आहे. पाकिस्तानातील आयपी ॲड्रेसवर मेल केल्याची माहिती गुगलने दिलेल्या अहवालातून उघड झाली आहे. कुरुलकर याने देशाच्या सुरक्षेला बाधा आणणारे काही छायाचित्रे पाठवल्याचा संशयदेखील तपास यंत्रणेला आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटाॅप आणि मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून, याबाबतचा अहवाल एटीएसला मिळाला आहे.

२०२२ मध्ये कुरुलकर याने सहा देशांना भेटी दिल्या आहेत. शासकीय पारपत्राद्वारे कुरुलकर याने परदेशात जाऊन पाकिस्तानी हेरांच्या भेटी घेतल्याचा संशय एटीएसला आहे. परदेशात कोणाची भेट घेतली याअनुषंगाने चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसPakistanपाकिस्तानSocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारीDefenceसंरक्षण विभाग