चॉकलेटच्या आमिषाने अत्याचार
By Admin | Updated: January 29, 2017 04:13 IST2017-01-29T04:13:41+5:302017-01-29T04:13:41+5:30
चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून एकाने सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केला. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पिंपरीगावात घडली. यशोधरण गोपाल (वय ५४) असे

चॉकलेटच्या आमिषाने अत्याचार
पिंपरी : चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून एकाने सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केला. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पिंपरीगावात घडली. यशोधरण गोपाल (वय ५४) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा केरळचा रहिवासी आहे. एका खासगी कंपनीत तो नोकरी करत असून, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत आहेत.
पीडित मुलगी आणि तिची दहा वर्षांची बहीण गुरुवारी रस्त्यावर खेळत होत्या. त्या वेळी आरोपी यशोधरण तिथे आला. त्याने सहावर्षीय मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून त्याच्या राहत्या घरी घेऊन गेला. बराच वेळ झाल्यानंतरही आपली बहीण आली नसल्याने तिची मोठी बहीण आरोपीच्या घरी गेली. त्या वेळी दरवाजा ठोठावला असता आरोपीने उघडला नाही. तिने खिडकीतून आतमध्ये पाहिले असता आरोपी यशोधरण हा मुलीशी अश्लील चाळे करत होता. मुलीने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. आईने त्याच्या विरोधात तक्रार दिली असल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)