शहरं
Join us  
Trending Stories
1
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
2
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
3
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
4
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
5
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
6
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
7
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
8
हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
9
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
10
चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे!
11
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
12
जगभर: तरुणीवर अत्याचार, इटलीत थेट कायदाच बदलला !
13
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
14
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
15
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
16
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
17
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
18
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
19
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
20
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
Daily Top 2Weekly Top 5

अत्रे यांचे सोपे-उत्स्फूर्त लिखाण आजही वाचकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 06:01 IST

साहित्यिक द. मा. मिरासदार : आचार्य अत्रेंच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त साधला संवाद

प्रज्ञा केळकर-सिंग 

पुणे : ‘विनोदी साहित्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यात आचार्य अत्रे यांचे मोलाचे योगदान आहे. अत्रे म्हणजे विनोदाचा धबधबा होते. पिढ्या बदलल्या तरी मनुष्याचा स्वभाव बदलत नाही, ही नस आचार्य अत्रेंनी बरोबर ओळखली होती. त्यांचे लिखाण सहजसोपे, उत्स्फुर्त असल्याने आजही वाचकांना आपलेसे वाटते,’ या शब्दांत ज्येष्ठ विनोदी साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी प्रल्हाद केशव अत्रे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

आचार्य अत्रे यांच्या पन्नासाव्या स्मृतीदिनानिमित्त ‘लोकमत’ने ब्याण्णव वर्षिय द. मा. यांच्याशी संवाद साधला. या वेळी द. मा. म्हणाले, आचार्य अत्रेंनी लेखनात कमालीचे वैविध्य जपले. त्यांनी कवितेपासून सुरुवात केली आणि नंतर विडंबनाकडे वळले. गडकरी यांच्यानंतर उत्तम नाटककार रंगभूमीला मिळाला नव्हता. अत्रेंनी रंगभूमीवरील ही उणीव भरुन काढली. एकदा बालमोहन नाटक मंडळीचे दामूअण्णा जोशी अत्रेंकडे आले. ते म्हणाले, ‘अत्रे, लोकांना नाटकामध्ये नवं काहीतरी हवं आहे. बघा प्रयत्न करु.’ अत्रे शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. त्यांनी मुलांसाठी एक-दोन नाटकं लिहिली होती. जोशींच्या विनंतीनंतर त्यांनी लिहिलेले पहिले नाटक म्हणजे ‘साष्टांग नमस्कार’! हे नाटक विडंबनात्मक होते. औंधचे राजे त्या वेळी या नाटकाचा प्रचार करत असत. संस्थानात त्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ हा उत्तम व्यायाम आहे, असे सांगत असत. त्यांची थट्टा करण्यासाठी आचार्य अत्रेंनी हे नाटक लिहिले. त्यातील रावबहादूर हे पात्र खूप गाजले.सर्वसामान्यांसाठीचा विनोद अत्रेंकडून शिकलो‘मला कॉलेजला असल्यापासून आचार्य अत्रेंचे प्रचंड आकर्षण होते. बीएचे शिक्षण घेताना प्राध्यापक वाटवे आम्हाला अत्रे यांच्या खंडाळयातील बंगल्यावर घेऊन गेले होते. तेव्हा त्यांची पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांची खूप भाषणेही मी ऐकली. अत्रेंचे नाटक, चित्रपट, साहित्य यांवर मी स्वतंत्रपणे व्याख्याने दिली आहेत. सामान्य लोकांनाही कळेल, असा विनोद असावा, हे मी अत्रेंकडून शिकलो.’ - द. मा. मिरासदार

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणे