शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
5
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
6
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
7
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
8
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
9
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
10
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
11
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
12
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
13
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
14
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
15
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
16
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
17
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
18
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
19
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
20
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य

एटीएमची अदलाबदली; २१ ज्येष्ठांच्या; पेन्शनची रक्कम हडपणारा गजाआड

By नम्रता फडणीस | Updated: February 18, 2025 18:13 IST

आरोपीकडे सापडली तब्बल १६६ एटीएम , १६ गुन्हे उघडकीस आणून १४ लाखांचा ऐवज हस्तगत

पुणे : ज्येष्ठ नागरिक पेन्शनची रक्कम काढण्यास एटीएममध्ये येतात हे माहिती असल्याने तो ए टी एम समोर थांबायचा. ज्या ज्येष्ठ नागरिकांना एटीएम मशीन मधून पैसे काढता येत नाहीत, अशा ज्येष्ठ नागरिकांस पैसे काढण्यास मदत करण्याचे भासवत त्यांच्याकडून एटीएम कार्डचा पिन नंबर व एटीएम कार्ड हातात घेतल्यानंतर हातचलाखीने दुसरे एटीएम कार्ड बदलून एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर तो एटीएम पीन मॅच होत नसल्याचे सांगायचा.बँकेत जाऊन चौकशी करा, असे सांगून तो तेथून निघून जायचा. अशाप्रकारे हातचलाखीने ए टी एम कार्डची अदलाबदली करुन २१ ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणा-या आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. आरोपीकडे तब्बल १६६ एटीएम कार्ड सापडली आहेत. त्याने पुण्यातील २१ नागरिकांच्या केलेल्या फसवणुकीपैकी पैकी १६ गुन्हे उघडकीस आणून १३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

राजू प्रल्हाद कुलकर्णी (वय ५४, रा. नेताजीनगर, अलानहली, म्हैसूर, कर्नाटक, सध्या रा. धनकवडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १६ गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून त्यात १७ लाख ९२ हजार ७०० रुपयांची रक्कम हडपली होती. त्यापैकी १३ लाख ९२ हजार ९०० रुपये हस्तगत करण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले आहे. शास्त्री रोडवरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एकाने ज्येष्ठ नागरिकाचे ए टी एम कार्ड बदली करुन त्यांच्या खात्यातून २२ हजार रुपये काढून घेऊन फसवणुक केली होती. २ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या गुन्ह्याच्या तपासात करताना पोलीस अंमलदार मयुर भोसले व आशिष खरात यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय खबरीच्या मदतीने राजू कुलकर्णी याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या बँकेचे तब्बल १६६ ए टी एम कार्ड मिळून आले. अधिक चौकशीत त्याने हातचलाखीने अनेकांची फसवणुक केल्याचे उघड झाले. आतापर्यंत त्याने २१ नागरिकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी १६ गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहे. त्यात एकूण १७ लाख ९२ हजार ७०० रुपयांची त्याने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यात विश्रामबाग( ५ लाख ७९ हजार), सहकारनगर (३लाख ५५ हजार), कोथरुड (२ लाख ४५हजार), सिंहगड रोड, बिबवेवाडी (प्रत्येकी १ लाख) शिवाजीनगर (८० हजार रुपये) यांचा समावेश आहे. 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके, पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार अशोक माने, मयुर भोसले, सचिन कदम, गणेश कोठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, शिवा गायकवाड, संतोष शेरखाने, नितीन बाबर व सागर मोरे यांनी केली आहे.

अनेक जण फसवणुकीपासून अनभिज्ञच

विश्रामबाग पोलिसांनी हस्तगत केलेल्या एटीएम कार्डवरुन फसवणुक झालेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधला असता त्यातील अनेकांनी बँक खात्यात किती शिल्लक आहे, हेच पाहिले नसल्याने आपली फसवणूक झाल्याबाबत ते अनभिज्ञच होते असे पोलिसांनी सांगितले.

कन्नड भाषिकांची घेतली मदत

राजू कुलकर्णी हा काहीही बोलत नाही. आपल्याला मराठी समजत नाही, असे सांगतो. त्यामुळे त्याला बोलते करण्यासाठी पोलिसांनी कन्नड भाषिकांची मदत घेतली. त्याने इतरही शहरामध्ये आणखी गुन्हे केले असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसatmएटीएमArrestअटक