शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

Atal Bihari Vajpayee : ...अाणि त्याच्यासाठी अटलजी दहा पाऊले मागे अाले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 9:37 PM

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या अाठवणींना उजाळा दिला.

पुणे :  एकदा अटलबिहारी बाजपेयी दाेन दिवसांच्या पुणे दाैऱ्यावर अाले हाेते. पुणे दाैऱ्यावरुन ते रेल्वेने मुंबईकडे जाणार हाेते. त्यावेळी मी सुद्धा त्यांच्याबराेबर हाेताे. त्यांना गाडीतून पुणे रेल्वेस्टेशनला साेडले. ते रेल्वेत बसणार तेवढ्यात त्यांना काहीतरी अाठवले अाणि ते दहा पाऊले मागे अाले. तेव्हा अाम्ही त्यांना विचारलं की काेणाला बाेलवायचंय का ? काेणाशी बाेलायचयं का....? तर ते नाही म्हणाले, अाणि दाेन दिवस त्यांच्यासाेबत जाे ड्रायव्हर हाेता, त्याला त्यांनी नमस्कार करत नमस्कार चक्रधर असे ते म्हणाले. एवढा माेठा माणूस दाेन दिवसाच्या सहवासात असलेल्या ड्रायव्हरचा सन्मान करताे यातच त्यांचं किती माेठं मन हाेतं याचा प्रत्यय येताे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट अटलबिहारीजींची अाठवण सांगत हाेते. 

     माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं अाज (16 अाॅगस्ट) दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 93व्या वर्षी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण भारतातून दुःख व्यक्त करण्यात येत अाहे. पुण्यात वाजपेयी जेव्हा यायचे तेव्हा त्यांच्यासाेबत बापट असयाचे. त्यांनी वाजपेयींच्या पुण्यातील अनेक अाठवणींना उजाळा दिला.     बापट म्हणाले,  पुण्यात अटलजी अालेत अाणि अाम्ही त्यांच्यासाेबत नाही, असे झालेच नाही. मंगेशकर हाॅस्पिटलचे उद्घाटन, बाबासाहेब पुरंदरेंचा पुण्यभूषण सत्कार, रमणबागेत झालेला गीतरामायणाचा कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांना ते पुण्यात अाले हाेते. पक्षाचा पाया मजबुत करण्यात अाणि देश पातळीवर पक्ष उंचीवर नेण्यात अटजींचं खूप माेठं याेगदान अाहे. अटलजींची कारकिर्द खूप गाजली. संघटनेच्या वाढीसाठी देशभर अटलजी खूप फिरले. जनसंघात अनेक पदे त्यांनी भूषवली. संघटनेच्या बळकटीसाठी एसटी, माेटरसायकलवरुनही ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरले अाहेत. प्रगल्भ विचार, व्यापक भूमिका, सर्वांना एकत्र घेऊन काम अाणि अनेक पक्षांना साेबत घेऊन सरकार चालविण्यात अटलजी यशस्वी झाले. देश-विदेशात त्यांनी पक्षाचे नाव पाेहचवले. ते उत्तम कवी, वक्ते हाेते. त्यांच्या इतका प्रवास काेणी केला नसेल. त्यांची वैचारिक बैठक पक्की हाेती. एकमताने पराभव झाल्यानंतर राजीनामा देताना त्यांचं लाेकसभेतलं भाषण हा एक एेतिहासिक ठेवा अाहे. राजकारणातले अनेक चढउतार त्यांनी पाहिले पण ते अविचल असायचे. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीPuneपुणेgirish bapatगिरीष बापटDeathमृत्यू