शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh: अशा वेळी नागरिकांनी पेटून उठलं पाहिजे; महाराष्ट्र बंदला पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 16:33 IST

विकृतीचा निषेध म्हणून आपण सुज्ञ नागरिकांनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणे आवश्यक आहे

पुणे : बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी येत्या २४ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक महाविकास आघाडीने दिली आहे. या बंदमध्ये मविआमधील सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत. डॉक्टर, वकील, पालक यांनीही बंदमध्ये सहभागी आवाहन मविआच्या नेत्यांनी केले आहे. तर या विकृतीचा निषेध म्हणून उद्धव ठाकरेंनी सुद्धा महाराष्ट्र बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. अशा घटनांच्या विरोधात आता पुणे व्यापारी महासंघाने पाठिंबा दर्शवला आहे. उद्या दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील असे महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले आहे.   

रांका म्हणाले, उद्या शनिवारी २४ ऑगस्टला सर्व पक्षांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. कोलकाता डॉक्टरांवरील अत्याचार, नाशिक, बदलापूर, कोल्हापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार विरोधात महाराष्ट्र बंद ठेवण्यात येणार आहे. विकृतीच्या विरोधात हा बंद पुकारला आहे. वास्तविक पाहता हा बंद कुठला राजकीय नाही. विकृतीच्या विरोधात आपण सुज्ञ नागरिकांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे. आपल्या घरी आई, बहीण लहान मुली आहेत. जेव्हा मुलींवर सामूहिक बलात्कार होतात. अशा वेळी नागरिकांनी पेटून उठलं पाहिजे, हे थांबलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आवाहन केले आहे कि दुपारी २ वाजेपर्यंत विकृतिच्या विरोधात बंद पळून निषेध करावा त्यांना आपण सहकार्य करावे. या बंदच्या विषयावरून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, सचिव, तसेच कमिटीसोबत व्हॉइस कॉल वर मिटिंग घेतली. सगळ्यांनी एकमताने मत मांडले कि, २ वाजेपर्यंत बंद ठेवू. मी आपण सगळयांना विनंती करतो, पुणे शहरातील सर्व व्यापारी बंधूंची दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहतील. आणि या विकृतीचा कडकडीत निषेध करून बंद ठेवतील. कोणीही दुकाने उघसू नयेत. व्यापारी सुद्धा अशा घटनांच्या विरोधात असतात हे आपण दाखवून द्यायला हवे.    

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसायMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliceपोलिसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार