Assistant Commissioner of Pune Municipal Corporation threatened with death; Case filed against 6 persons | पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी; ६ जणांवर गुन्हा दाखल

पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी; ६ जणांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देअतिक्रमण कारवाई दरम्यानचा प्रकार 

पुणे : पौड रोडवरील भीमनगर झोपडपट्टी ते मयुर कॉलनी दरम्यान अतिक्रमण कारवाई करत असताना त्याला आडकाठी आणून महापालिकेचे सहायक आयुक्त संदीप कदम यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

जावेद शेख, हसीना शेख व चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रकाश धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. पौड रोडवरील भीमनगर झोपडपट्टी ते मयुर कॉलनी दरम्यान रस्त्याचे मध्ये येणारे अतिक्रमण काढण्याची कारवाई बुधवारी दुपारी करण्यात येत होती. यावेळी आरोपींनी आमचे घर रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होत नाही. तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही. तुम्ही आम्हाला मोबदला दिला नाही. तुम्ही घर कसे पाडता बघून घेतो, आम्ही मेलाे तरी चालेल, परंतु तुम्हाला कामच करु देत नाही, असे म्हणून त्यांनी त्याचे वृद्ध आईवडिलांना रिकाम्या करावयाच्या खोलीमध्ये बसवून आता तुम्ही कारवाई करा व त्यांना काही बरे वाईट झाले तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल, असे म्हणून महापालिकेच्या कर्मचार्यांना शिवीगाळ केली.

तसेच त्यांनी एस आर एच्या अतिरिक्त आयुक्तांसमोर सहायक आयुक्त संदीप कदम यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तुम्ही सायंकाळी एकटे असता तुम्हाला बघून घेईन अशी धमकी दिली. पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला आहे

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Assistant Commissioner of Pune Municipal Corporation threatened with death; Case filed against 6 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.