मेहबुब काझी म्हणाले की, ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशनकडून रमजान ईदनिमित्त राबवलेला उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा असून भटकंती ट्रेकर्स मार्फत अविरतपणे कोरोना रुग्णांसाठीचा अन्नछत्र उपक्रम नारायणगावचे नाव उंचावणारा आहे. यावेळी नारायणगावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी यांच्यावतीनेही वाढदिवसानिमित्त १०० ताटांचे जेवण भटकंती ट्रेकर्स ग्रुपला देण्यात आले.
यानिमित्तानं ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशनचे मार्गदर्शक मेहबुब काझी, एजाज आतार, अध्यक्ष जुबेर आतार, उपाध्यक्ष रज्जाक काझी, सचिव रियाज मनियार, सहसचिव समीर इनामदार, कार्याध्यक्ष रेहान कुरेशी, सहकार्याध्यक्ष डाॅ. इम्रान शेख, खजिनदार तौसिफ पठाण, संचालक जावेद पटेल, इरफान काझी, प्रा. अशफाक पटेल, जुबेर शेख, जाकिर मनियार, दानिश इनामदार, मोईन इनामदार, फुरकान मोमिन, सोहेल इनामदार, सुफियान मोमिन, इब्राहिम पठाण, हैदर अन्सारी, अनिस इनामदार यांसह ग्रुपचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भटकंती ट्रेकर्स ग्रुपचे सुदीप कसबे, तुषार दिवटे, प्रणव भुसारी यांनी केलेल्या मदतीबद्दल ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशन व ज्ञानेश्वर औटी यांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला
१४ नारायणगाव मदत
भटकंती ट्रेकर्सला ड्रायफ्रुट लाडूसह १०० ताटांच्या जेवणासाठी आर्थिक मदत देताना ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशनचे पदाधिकारी.