अल्पवयीन मुलाला मारहाण; कपडे काढून अश्लील व्हिडीओ व्हायरल, रविवार पेठेतली घटना
By भाग्यश्री गिलडा | Updated: April 12, 2024 15:01 IST2024-04-12T15:00:54+5:302024-04-12T15:01:20+5:30
व्हिडिओ व्हायरल केल्यावर पाेलीसात तक्रार दिली तर, समाजाच्या ग्रुपवर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली

अल्पवयीन मुलाला मारहाण; कपडे काढून अश्लील व्हिडीओ व्हायरल, रविवार पेठेतली घटना
पुणे : रविवार पेठेत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला मारहाण बेदम मारहाण करून त्याचे अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार सम्रो आला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. ११) अन्सु शर्मा (वय- १९, रा.मंडई) आणि त्याच्या तीन साथीदारांवर डेक्कन पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार बुधवारी (दि. १०) रात्रीच्या सुमारास घडला आहे. याबाबत पीडित मुलाच्या आईने फिर्याद दिली आहे. तक्रारदार यांचा १६ वर्षीय मुलाचा मित्र अन्सु शर्मा व त्याचे तीन अनाेळखी साथीदार यांना अन्सुला मारहाण करण्यासाठी मुले पाठवल्याचा गैरसमज झाला. या कारणावरून तक्रारदार यांच्या मुलाला अन्सु शर्मा आणि त्याच्या तीन साथीदारांनी बेल्टने तसेच लाकडी बांबूने बेदम मारहाण करुन त्याला जखमी केले. त्यानंतर त्याचे कपडे काढून त्याला नग्न करत त्याचे अश्लील व्हिडीओ काढून ते साेशल मिडियावर व्हायरल केले. तसेच याबाबत पाेलीसात तक्रार दिली तर, समाजाच्या ग्रुपवर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली. याबाबत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाेलीस निरीक्षक साळुंखे करत आहेत.