सख्या भावाचा १४ वर्षाच्या बहिणीवर अत्याचार; गर्भवती मुलीने दिला बाळाला जन्म

By विवेक भुसे | Updated: September 20, 2023 15:47 IST2023-09-20T15:45:38+5:302023-09-20T15:47:00+5:30

मुलगी घरी असताना मोठ्या भावाकडून मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर

Assault on 14-year-old sister of Sakhya's brother; A pregnant girl gave birth to a baby | सख्या भावाचा १४ वर्षाच्या बहिणीवर अत्याचार; गर्भवती मुलीने दिला बाळाला जन्म

सख्या भावाचा १४ वर्षाच्या बहिणीवर अत्याचार; गर्भवती मुलीने दिला बाळाला जन्म

पुणे : एकाच घरात राहणारे ते दोघे सख्ये भाऊ बहिण मोठ्या भावाने आपल्या १४ वर्षाच्या बहिणीवर वारंवार लैगिक अत्याचार केला. त्यातून या मुलीने एका बाळाला जन्म दिला.

याबाबत या मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी २४ वर्षाच्या मोठ्या भावावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मागील एक वर्षांपासून सुरु होता.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, हे कुटुंब मुळचे कर्नाटक येथील राहणारे आहे. फिर्यादी या धुणे भांड्यांची कामे करतात. त्यांचे पती व २४ वर्षाचा मुलगा वॉचमन म्हणून काम करतात. ही मुलगी शाळा शिकते. ते घरी असताना मोठ्या भावाने या मुलीवर वारंवार लैगिक अत्याचार केला. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. परंतु, तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. तसेच ती वयात आली आहे, हे तिने घरी आईलाही सांगितले नव्हते. मंगळवारी तिच्या पोटात दुखायला लागले. तेव्हा तिला रुग्णालयात नेले. तेथे ही मुलगी गर्भवती असून तिला प्रसृती कळा सुरु झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर काही वेळातच तिने एका बाळाला जन्म दिला. डॉक्टरांनी कळविल्यानंतर पोलिसांनी मोठ्या भावावर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे तपास करीत आहेत.

Web Title: Assault on 14-year-old sister of Sakhya's brother; A pregnant girl gave birth to a baby