पुणे - नाशिक परिसरात चर्चेत असलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या सेटलमेंटचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी थेट आरोप करत या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा दावा केला आहे.लोकमतशी बोलताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितले की, तृप्ती देसाई यांच्याकडे या प्रकरणातील महत्त्वाचे व्हिडिओ पुरावे आधीपासूनच उपलब्ध होते. मात्र, तरीही त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यासोबत तडजोड केल्याचा आरोप आहे. या तडजोडीत कोट्यवधी रुपयांची आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच, SIT तपासादरम्यान ही बाब समोर आल्याचा दावाही त्यांनी केला. पीडितांना न्याय मिळावा म्हणून दिलेले पुरावे दाबले गेले, ही अत्यंत गंभीर बाब आहे, असेही त्या म्हणाल्या.
Web Summary : Rupali Patil Thombre alleges Trupti Desai settled the Kharat case for crores. She claims Desai possessed crucial evidence but compromised with Rupali Chakankar. Patil demands an SIT investigation and action against the accused, including Chakankar, urging victims to come forward.
Web Summary : रूपाली पाटिल ठोंबरे ने तृप्ति देसाई पर खरात मामले को करोड़ों में निपटाने का आरोप लगाया। उनका दावा है कि देसाई के पास महत्वपूर्ण सबूत थे, फिर भी उन्होंने रूपाली चाकणकर से समझौता किया। पाटिल ने एसआईटी जांच और चाकणकर सहित आरोपियों के खिलाफ कार्रवाई की मांग की, पीड़ितों से आगे आने का आग्रह किया।