शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक? राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
3
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
4
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
5
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
6
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
7
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
8
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
9
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
11
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
12
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
13
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
14
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
15
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
16
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
17
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
19
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
20
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

Ashadhi Wari: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत संविधानाचा जागर

By रोशन मोरे | Published: June 17, 2023 5:24 PM

या दिंडीच्या माध्यमातून संविधानात असलेली मूल्य आणि संतांनी सांगितलेली वचने, अभंग यांचा परस्पर संबंध कसा आहे याची जाणीव करून देत जागृती केली जात आहे...

उंडवडी (पुणे) :  जगद्गुरु संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना झाला आहे. या पालखी सोहळ्यामध्ये मागील पाच वर्षांपासून कीर्तनकार शामसुंदर महाराज सोन्नुर यांच्या नेतृत्वाखाली 'संविधान समता दिंडी' सामील होत आहे. या दिंडीच्या माध्यमातून संविधानात असलेली मूल्य आणि संतांनी सांगितलेली वचने, अभंग यांचा परस्पर संबंध कसा आहे याची जाणीव करून देत जागृती केली जात आहे.

संविधान दिंडीत पायी चालत असताना दिंडीत सहभागी झालेल्या पुरोगामी संघटनांच्या कार्यकत्यांकडून पथनाट्याद्वारे संविधानामधील समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, बंधुत्व ही मूल्य वारकरी पंथातील संतांच्या विचारांशी कशी सुसंगत आहेत हे उदाहरणासह पटवून देत आहे.

   यारे यारे लहान थोर     याती भलते नारी नरसंत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा दाखला देऊन संविधानामधील 'समता' या मूल्याशी त्याची सांगड घालून ती वारकऱ्यांना सांगितली जात आहे. तर तसेच संविधानातील मुल्य आणि संताचे विचार कसे सुसंगत आहेत हे सांगितले जाते. प्रा. सुभाष वारे, शरद कदम, वर्षा देशपांडे, नागेश जाधव, अविनाश पाटील हे संविधान समता दिंडीच्या आयोजनात महत्वाची भुमिका बजावतात. तर दिंडी सहभागी होणा-या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांशी समन्वाची जबाबदारी दीपक देवरे, सरस्वती शिंदे, सुमित प्रतिभा संजय हे करत असतात.

एक दिवस तरी वारी अनुभवा संविधान दिंडीची सुरुवात एक दिवस तरी वारी अनुभव या अनोख्या उपक्रमातून झाली. वारी विषयी पुरोगामी समजल्या जाणाऱ्या लोकांमध्ये ही वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या धारणा असतात.  तर कीर्तन करणाऱ्या काही महाराजांविषयी संविधानाविषयी चुकीचे आक्षेप असतात. हे दोन्ही दूर झाले पाहिजे या भूमिकेमधून एक दिवस वारी अनुभवा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली, असे शामसुंदर महाराज यांनी सांगितले

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीConstitution Dayसंविधान दिन