Join us  

देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:34 AM

'पंचायत 3' अवघ्या काही तासांत रिलीज होत होणार आहे. आता 'पंचायत 3' ची नेमकी रिलीजची वेळ काय आहे, याबद्दल जाणून घ्या (panchayat 3)

'पंचायत 3' वेबसिरीजची सर्वांना उत्सुकता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून 'पंचायत 3' ची उत्सुकता शिगेला होती. भारतातील सर्वात बहुप्रतिक्षित सिरीजमधील एक म्हणजे 'पंचायत 3'. जितेंद्र कुमारची प्रमुख भूमिका असलेली ही धम्माल वेबसिरीज पाहायला भारतच नव्हे तर जगभरातील प्रेक्षक उत्सुक असतील यात शंका नाही. 'पंचायत 3' रिलीज व्हायला अवघे काहीच तास बाकी आहेत. 'पंचायत 3' कोणत्या वेळी रिलीज होणार, याविषयी माहिती जाणून घ्या.

'पंचायत 3' च्या रिलीजची वेळ

'पंचायत 3' उद्या अर्थात २८ मेला रिलीज होणार आहे. आजवर प्राईम व्हिडीओवर रिलीज होणाऱ्या नवी सिरीज आणि सिनेमांची वेळ बघता प्रत्येक नवीन कलाकृती ही रात्री १२ वाजता रिलीज झालीय. अर्थात दिवस उलटला रे उलटले की बरोबर १२ च्या ठोक्याला नवीन सिरीज अथवा कलाकृती रिलीज होते. त्यामुळे आजवरचा इतिहास बघता 'पंचायत 3' सुद्धा २८ मेला नवीन दिवस सुरु होताच बरोबर १२ वाजता रिलीज व्हायची शक्यता आहे.

'पंचायत 3' विषयी थोडंसं...

'पंचायत 3' बद्दल सांगायचं झालं तर.. 'पंचायत' चे आधीचे दोन्ही सीझन चांगलेच गाजले. फुलेरा गावात घडणारी हलकीफुलकी कहाणी म्हणून 'पंचायत' सर्वांच्या पसंतीस उतरली. दुसऱ्या सीझनमध्ये शेवटचा भाग प्रेक्षकांना रडवून गेला. आता 'पंचायत 3' मध्ये फुलेरा पंचायतीमध्ये नवीन सचिव कोण होणार, याची रंजक कहाणी बघायला मिळणार आहे. जितेंद्र कुमार, रघूवीर यादव, नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका 'पंचायत 3' मध्ये आहेत.

टॅग्स :पंचायत समितीनीना गुप्ताजितेंद्र