Join us  

धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 10:47 AM

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी वॅक्टर याची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लॉस एंजिल्स येथे त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये ३७व्या वर्षीय जॉनी वॅक्टरने त्याचा जीव गमावला आहे.

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी वॅक्टर याची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लॉस एंजिल्स येथे त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये ३७व्या वर्षीय जॉनी वॅक्टरने त्याचा जीव गमावला आहे. त्याच्या निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जॉन वॅक्टरच्या हत्येमुळे हॉलिवूड सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला असून जॉनी वॅक्टरच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. 

शनिवारी(२५ मे) लॉस एंजिल्स येथे  ही घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, पहाटे ३ वाजता जॉनी वॅक्टरवर हल्ला झाल्याची माहिती त्याची आई स्कारलेट यांनी दिली आहे. जॉनी वॅक्टरच्या कारमधून चोर कनव्हर्टर चोरण्याचा प्रयत्न करत होते. जॉनी वॅक्टरने त्यांना थांबवण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रयत्न केला नव्हता. तरीही चोरांनी त्याला गोळी मारून त्याची हत्ता केल्याचं स्कारलेट यांनी सांगितलं आहे. या प्रकरणानंतर त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

जॉनी वॅक्टरने २००७ साली आर्मी वाइव्स या शोमधून त्याच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक शोमध्ये तो महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसला. 'एनसीआईएस', 'द ओए', 'वेस्टवर्ल्ड', 'द पॅसेंजर', 'स्टेशन 19', 'बार्बी रिहॅब', 'साइबेरिया', 'एजंट एक्स', 'वँटास्टिक', 'अॅनिमल किंगडम', 'हॉलिवूड गर्ल', 'ट्रेनिंग डे' आणि 'क्रिमिनल माइंड्स' यामध्ये तो झळकला होता. 

टॅग्स :सेलिब्रिटीगुन्हेगारी