शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता 'एआय दिंडी'...! नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:36 IST

एआय म्हणजे मराठीत ‘आई’ अर्थात ‘माउली’ (भक्तांना आधार देणारी, प्रेमळ शक्ती) अशा 'एआय'च्या घटकांचा खुबीने वापर करण्यात आला आहे.

पुणे : सध्या ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’(एआय)चा सर्वत्र बोलबाला आहे. आता वारीतही ‘एआय’ दिंडी पाहायला मिळणार असून, यात ऑल इन्क्लुसिव्ह दिंडी, (विविध भाषा, प्रांत, वय आणि नोकरी / व्यवसायांतील लोकांना सामावून घेणारी सर्वसमावेशक दिंडी), आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर, आध्यात्मिक इंटेलिजन्स (नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवण्याचा एक प्रयत्न) आणि एआय म्हणजे मराठीत ‘आई’ अर्थात ‘माउली’ (भक्तांना आधार देणारी, प्रेमळ शक्ती) अशा 'एआय'च्या घटकांचा खुबीने वापर करण्यात आला आहे. परंपरेची ओळख सांगणारी आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी ही दिंडी यंदाच्या वारीचे आकर्षण ठरणार आहे.

भाविकांना जून महिना जवळ यायला लागला की वेध लागतात ते आषाढी पायी वारीचे! जवळपास १८ वर्षांपूर्वी याच वारकरी परंपरेत नवीन पिढीला आकर्षित करण्यासाठी आधुनिक दिंडीची एक अभिनव संकल्पना अस्तित्वात आली आणि 'आयटी दिंडी' या नावाने ती लोकप्रियदेखील झाली. मात्र, या नावाने पालखी सोहळ्यात सहभागी होत असताना आयटी दिंडीच्या टीमला काही मर्यादा लक्षात आल्या. अनेकांना वाटते की, फक्त आयटी क्षेत्रातीलच लोक या दिंडीत सहभागी होऊ शकतात का? घरातील अन्य व्यक्ती चालतील का? मी गृहिणी आहे.अथवा निवृत्त आहे, मला सहभागी होता येईल का... इ. यासाठी अधिकाधिक लोकांना या वारीमध्ये सहभागी करून घेणे, त्यांना आपल्या संस्कृतीची, वारकरी संप्रदायाची ओळख करून देणे आणि वारीसारख्या अद्भुत आध्यात्मिक अनुभवाची सुलभता निर्माण करणे या उद्देशाने वारीच्या पुणे ते पंढरपूर या टप्प्यांसाठी 'एआय दिंडी' या नावाने सेवा द्यायचे आमच्या टीमने ठरवले आहे. परंतु, पूर्वीप्रमाणेच आळंदी ते पुणे या टप्प्यात ‘आयटी दिंडी’ या नावाने व्यवस्था कार्यरत राहील, असे टीमकडून सांगण्यात आले आहे.एआय दिंडी काय करते ?

* लोकांना सोयीच्या कोणत्याही दिवशी कोणत्याही टप्प्यात सहभागी होता येईल, अशी खास व्यवस्था आयोजकांनी विकसित केली आहे.

* ज्या दिवशी ज्या टप्प्यावर पालखी आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी बसची व्यवस्था केली आहे. उदाहरणार्थ, शनिवारी तुम्हाला वेळ आहे आणि पालखी जेजुरी ते वाल्हे या टप्प्यात आहे, तर आम्ही स्वारगेटहून जेजुरीसाठी बस ठेवतो. त्या टप्प्याची वारी केली की संध्याकाळी परत पुण्यात आणतो.

* वारीत चालताना आपल्याला अभंग म्हणता यावेत, टाळ वाजवता यावा, पावले खेळता यावीत यासाठी एआय दिंडी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे ‘भजनसंध्या आणि वारीतील खेळ’ आयोजित करते.

* प्रत्येक टप्प्यासाठी नाममात्र सेवाशुल्क आकारले जाते. त्यामध्ये बससेवा (पुण्यापासून पुण्यापर्यंत), पाण्याच्या बाटल्या, नाष्टा, जेवण व एआय - दिंडी i नावाची टोपी दिली जाते.

• सलग काही दिवस वारी करायची असल्यास राहण्याचीही व्यवस्था केली जाते.

• संपूर्ण वारी (आळंदी ते पंढरपूर) करायची असल्यास तिचीही आखणी आणि मदत केली जाते.

इथे साधा संपर्क

नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या :

वारी २० जून ते ५ जुलै - २०२५ पर्यंत आहे.www.aidindi.orgसंपर्क : 8055566773 / 8055566775 / 8055566774

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५PandharpurपंढरपूरIndian Festivalsभारतीय उत्सव-सण