शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

Ashadhi Wari: जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी येथे निरा स्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 12:52 PM

या घाटावर आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या घालून नयनरम्य पद्धतीने सजावट करण्यात आली होती....

बावडा (पुणे) : जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना पुणे जिल्ह्यातील शेवटचा इंदापूर तालुक्यातील सराटी या गावातील मुक्काम आटोपल्यानंतर नीरा नदीच्या किनाऱ्यावर यावर्षी सिमेंटचा घाट बांधण्यात आला. या घाटावर आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या घालून नयनरम्य पद्धतीने सजावट करण्यात आली होती.

अशा या निरा नदीच्या घाटामध्ये हरिनामाचा जयघोष करीत ज्ञानोबा... माऊली... तुकाराम... व टाळ मृदंगाच्या निनादात सराटी येथे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना चंदन अत्तरचा लेप देत पालखी सोहळ्यातील प्रमुख विश्वस्तांच्या उपस्थितीत स्नान घातले. हा नयनरम्य सोहळा पूलाच्या दोन्ही बाजूने उभा राहून हजारो भाविक निरास्नानाचा दैदीप्यमान सोहळा पार पडत असताना पहात असल्याचे निदर्शनास आले.

यावर्षी पावसाने हजेरी न लावल्यामुळे निरा नदीला पाणी येऊ शकले नाही म्हणून प्रशासनाच्या वतीने टँकरद्वारे पाणी निरा नदीच्या पात्रात सोडून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना निरास्नान घालण्यात आले.त्यानंतर पादुका पालखी तळावरती आणण्यात आली. यावेळी नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

यावेळी विश्वस्तांच्या वतीने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे, विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,पोलीस निरीक्षक दिलीप पवार, गटशिक्षणाधिकारी खरात,उप पोलीस निरीक्षक नागेश पाटील ,उप पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, आधी अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी उपसरपंच संतोष कोकाटे, हनुमंत कोकाटे, अमर जगदाळे, बाप्पू कोकाटे, राजेंद्र कुरळे, मनोज जगदाळे, बाबासाहेब कोकाटे, काकासाहेब जगदाळे, लालासाहेब काटे, अण्णा कोकाटे, रोहित जगदाळे, सुधीर कोकाटे, ग्रामसेवक साळुंखे  व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर पालखीने नीरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. या पालखी बरोबर पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांनी पालखी सोलापूर जिल्ह्यात पोच केली. तेथे सोलापूर जिल्ह्याचे  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व इतर मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले.

टॅग्स :Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPuneपुणेAshadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022