शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

"माउली..माउली..' नामाच्या जयघोषात ज्ञानदेवांच्या पादुकांना नीरा स्नान;सोहळ्याचा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 21:00 IST

- नीरा भिवरा पडता दृष्टी ! स्नान करिता शुद्ध सृष्टी! अंती तो वैकुंठप्राप्ती ! ऐसे परमेष्ठी बोलिला !!''माउली माउली'' नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात गुरुवारी माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.

- भरत निगडे

नीरा : नीरा भिवरा पडता दृष्टी ! स्नान करिता शुद्ध सृष्टी! अंती तो वैकुंठप्राप्ती ! ऐसे परमेष्ठी बोलिला !!''माउली माउली'' नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात गुरुवारी माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर माउलींच्या पालखी सोहळ्याने आपल्या वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन माउलींचा पालखी सोहळा सुरू करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला.

पालखी सोहळा सकाळी साडेसहा वाजता रामायणकार महर्षी वाल्मीकींच्या वाल्हानगरीचा निरोप घेऊन लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. सकाळी आठ वाजता न्याहारीसाठी पिंपरे (खुर्द) येथील अहिल्याबाई होळकर विहिरीच्या समोर विसावा घेतला. पिंपरे व पिसुर्टी ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ग्रामीण भागातील लोक बेसन-भाकरी, वेगवेगळ्या चटण्या, खरडा, ताज्या रानभाज्या अशी शिदोरी घेऊन आले होते. अर्धा तासाच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा दुपारच्या भोजनासाठी व विश्रांतीसाठी नीरेकडे मार्गस्थ झाला.

नीरानगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माउलींचा पालखी सोहळा साडेदहा वाजता दाखल झाला. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रामसेवक रमेश राऊत सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले. अकरा वाजता पालखी सोहळा नीरा नदीच्या काठावरील नयनरम्य विसावास्थळी विसावला. नीरा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखी तळाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी रांगा लावून माउलींच्या पालखीतील पादुकांचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले. दुपारी दीड वाजता सोहळा मार्गस्थ झाला.

आरफळकरांसह आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळा प्रमुख भावार्थ देखणे यांच्यासह सोहळ्यातील मानकऱ्यांनी माउलींच्या पादुका दत्तघाटावर आणल्या. ''माउली माउली'' नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पादुकांना पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. स्नानानंतर स्थानिक महिलांनी मंदिरासमोर फुगड्या खेळत फेरही धरला. स्नानाचा हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दत्तघाटावर, तसेच नदी तीरावर एकच गर्दी केली होती.

एक तास उशिरा सोहळा

पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील शेवटच्या विसाव्या स्थळ असलेल्या नीरा येथे नियोजित वेळेत पोहोचला; पण पुढे सातारा जिल्ह्यात जाण्यासाठी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एक ते दीड तास वाहने एकाच जागी उभी होती. सातारा वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे हे वाहतूककोंडी झाल्याचे सोहळा मालकांनी सांगितले. त्यामुळे एक वाजता निघणारा सोहळा तब्बल एक तास उशिरा म्हणजे दोन वाजता निघाला तरी वाहनांच्या रांगा लागलेल्याच होत्या.आकर्षक फुलांच्या पायघड्या

नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून सर्वांत पुढे तुतारी वादक सलामी देत होते, मानाचे दोन अश्व, भगव्या पताका व वीणा घेतलेले वारकरी आणि माउलींचा फुलांनी सजवलेला रथ नीरा स्नानासाठी वैभवी लवाजम्यासह चालत होता. ब्रिटिशकालीन पुलावरून पालखी सोहळा जाताना मंद वारा सुटला होता. पैल तीरावर पालखीतील पादुका सोहळ्याचे मालक राजाभाऊ पवार-आरफळकर यांच्याकडे देण्यात आल्या. पुलापासून दत्ताच्या पायऱ्यांपर्यंत माउलींच्या पादुका जाण्यासाठी दुतर्फा बॅरिकेडिंग केले होते. यामध्ये आकर्षक फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. 

माउलींचे सातारा जिल्ह्यात स्वागत

माउलींच्या स्नानापूर्वी पालखी सोहळ्याला प्रशासनाच्या वतीने अपर पोलिस महासंचालक निखिल गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, डीवायएसपी तानाजी बरडे, पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे यांच्यासह नीरा व परिसरातील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याला निरोप दिला, तर सातारा जिल्ह्याच्या वतीने खा. उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, माजी खा. रणजितसिंह निंबाळकर, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस प्रमुख तुषार दोशी, अपर पोलिस प्रमुख वैशाली कडूकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील, पाडेगावचे सरपंच मंगल माने, उपसरपंच दशरथ धायगुडे यांच्यासह सातारा जिल्हा प्रशासनातील पदाधिकाऱ्यांनी उत्साहात स्वागत केले.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Maharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५