Video: माऊलींची पालखी दिवेघाट पार करत असताना बैल उधळला; पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:49 IST2025-06-24T15:48:39+5:302025-06-24T15:49:23+5:30

Diveghat Wari Bull Goes Wild Video: सुमारे दोन तास घाटातील वाटचाल पूर्ण करून सोहळा संध्याकाळी सासवड मुक्कामी दाखल झाला. माउलींचा पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर दुपारी २ वा. वडकीनाला येथे विसाव्यासाठी थांबला.

ashadhi wari A bull went wild while Mauli's palanquin was crossing Diveghat; watch the video | Video: माऊलींची पालखी दिवेघाट पार करत असताना बैल उधळला; पाहा व्हिडिओ

Video: माऊलींची पालखी दिवेघाट पार करत असताना बैल उधळला; पाहा व्हिडिओ

Diveghat Bull Attack Video: विठ्ठलाच्या नामाचा अखंड जयघोष करीत व भक्तीचे भारावलेपण घेऊन पंढरीच्या वाटेवर असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने लाखो वैष्णवांचा साथीने ज्येष्ठ कृष्ण योगिनी एकादशी रविवारला (दि.२२ जून) दिवे घाटातील वारीच्या वाटेवरील सर्वात कठीण टप्पा पार केला. सुमारे दोन तास घाटातील वाटचाल पूर्ण करून सोहळा संध्याकाळी सासवड मुक्कामी दाखल झाला. माउलींचा पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर दुपारी २ वा. वडकीनाला येथे विसाव्यासाठी थांबला.

यावेळी माऊलींची पालखी दिवेघाट पार करत असताना एक अनपेक्षित घटना घडली. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट पार करत असताना एक अनपेक्षित घटना घडली. माऊलीची पालखी विसाव्याच्या ठिकाणी असताना जमलेल्या गर्दीमुळे बैल उधळला. अचानक घडलेल्या या घटनेने वारकरी आणि उपस्थित नागरिकांची धावाधाव झाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.  

दरम्यान, रविवारी सर्वात अवघड टप्पा समजल्या जाणाऱ्या दिवेघाटातील वाटेने माऊलींच्या रथाचा प्रवास सुरू झाला होता. रथाला आकर्षक बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या. वातावरण ढगाळ स्वरूपाचे,जोरदार वाहता वारा व हवेत काहीसा थंडावा असल्याने उन्हाचा त्रास झाला नाही. आज दिवसभर पाऊस नसल्यामुळे माऊली भक्त भिजले नाहीत.मोठय़ा अंतराचा हा टप्पा चढताना न थकता दिंडीतील वारकरी निरनिराळी पदे, अभंग, भारुडे,गौळणी म्हणताना दिसत होते. वारकऱ्यांमध्ये एक वेगळेच चैतन्य संचारले होते.

Web Title: ashadhi wari A bull went wild while Mauli's palanquin was crossing Diveghat; watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.