शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

अरुण गवळीच्या पत्नीला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 9:33 PM

दुकाने व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे मोबाइलवरून ५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

ठळक मुद्देअटीं व दोन्ही गुन्ह्यात प्रत्येकी ३० हजार रुपयां जातमुचलक्यावर न्यायालयाने हा जामीन मंजुर

पुणे : कुख्यात गुंड अरूण गवळी यांची पत्नी आशा ऊर्फ मम्मी अरुण गवळी यांना खंडणीच्या गुन्ह्यात मंचर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या प्रकरणात खेड न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.के.ब्रम्हे यांनी हा आदेश दिला आहे. पोलिसांच्या सुचनेनुसार पोलीस स्टेशनमध्ये हजेरी, पोलिसांना तपासात सहकार्य, तपासामध्ये ढवळाढवळ नाही, फिर्यादीवर दबाब टाकायचा नाही, न्यायालयाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्र सोडता येणार नाही, सध्याचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक तपास अधिका-यांना देणे,आदी अटीं व दोन्ही गुन्ह्यात प्रत्येकी ३० हजार रुपयांचा जातमुचलक्यावर न्यायालयाने  हा जामीन मंजुर केला आहे.  याबाबत चंदननगर येथील एका व्यापा-याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज यादव (लोणी धामणी, ता. आंबेगाव), मोमीन मुजावर (रा. मुंबई) आणि बाळा पठारे (रा. वाघोली) आणि अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यादव, मुजावर आणि पठारे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १३ ते १६ एप्रिल या कालावधीत घडली. पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे चंदननगर व लोणी धामणी येथे दुकाने आहे. तेथे त्यांच्या भावाचेही कपड्याचे दुकान आहे. ही तिन्ही दुकाने व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे मोबाइलवरून ५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास दुकानाची मोडतोड करण्याची आणि जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात मम्मी यांनी अ‍ॅड. पी.बी. बिराजदार, अ‍ॅड. नितीन शिंदे, अ‍ॅड. सुरेश जाधव आणि अ‍ॅड. डी. एल. वाठोरे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सरपंच सावळा नाईक यांच्याकडून दीड लाख रुपये खंडणी घेतल्याप्रकरणी मंचर पोलिसात मम्मीसह दहा जणांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातही बचाव पक्षाच्या युक्तीवादानंतर मम्मीला अटकपूर्व जामीन मंजुर करण्यात आला. 

टॅग्स :PuneपुणेKhedखेडCrimeगुन्हाPoliceपोलिस