शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

पालखी आगमनापूर्वी जागा ताब्यात द्यावी

By admin | Updated: June 21, 2016 00:28 IST

घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने जागा देण्याचे मान्य केले आहे. ती जागा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी आगमनापूर्वी नगर परिषदेच्या ताब्यात द्यावी

इंदापूर : घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने जागा देण्याचे मान्य केले आहे. ती जागा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी आगमनापूर्वी नगर परिषदेच्या ताब्यात द्यावी, अशी आग्रही भूमिका घेऊन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी, प्रस्थान रस्त्याच्या कडेची संरक्षक भिंत बांधण्याचा मागील मासिक बैठकीतील विषय स्थगित ठेवण्यास भाग पाडले.संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी नियोजनासंदर्भात आज (दि. २०) नगराध्यक्षा उज्ज्वला राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसमोर एकूण ११ विषय ठेवण्यात आले होते. ते सर्व मंजूर करण्यात आले. शनिवारी (दि. १८) नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मासिक बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये डॉ. आंबेडकरनगर व अण्णा भाऊ साठेनगरला दुभागून इंदापूर-अकलूज रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करते. या रस्त्याच्या कडेला, ज्योतिबा मंदिराच्या बाजूला नगर परिषदेने कचरा डेपो केला आहे. ती जागा पालखी आगमनापूर्वी नगर परिषदेच्या ताब्यात द्यावी. म्हणजे पालखी आगमनापूर्वी जोतिबाच्या मंदिराजवळील कचरा त्या जागी टाकण्यात येईल, हा आग्रह धरला. हा निर्णय होईपर्यंत संरक्षक भिंत बांधण्याच्या निर्णयास स्थगिती द्यावी, असा निर्णय घेण्यास सर्वसाधारण सभेस भाग पाडले. पाळणे व मनोरंजनाची साधने आणू इच्छिणाऱ्या व्यावसायिकास कमीत कमी पन्नास हजार रुपये भाडे आकारण्यात यावे. त्यापेक्षा जास्त भाडे देणारास परवानगी दिली जावी, अशी सूचना नगरसेवक अ‍ॅड. गिरीश शहा यांनी मांडली. मनोरंजनाचे साहित्य घेऊन येणाऱ्यांना आडदांड प्रवृत्तीच्या युवकांकडून त्रास दिला जात असल्याचे प्रकार घडतात. याबाबत नगरपरिषदेने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना नगरसेवक इब्राहिम शेख यांनी मांडली. राऊत यांनी आभार मानले. या बैठकीस अलका ताटे, माया विंचू, सायरा पठाण, वर्षा मखरे, कमल पवार व इतर नगरसेवक उपस्थित होते.