मोटार चाेरणाऱ्या आराेपिंना लातुर येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:13 IST2021-01-25T04:13:36+5:302021-01-25T04:13:36+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी बसवराज चावरे (वय २३ रा. चऱ्होली बुद्रुक, ता. खेड), बालाजी बसवराज चावरे (वय २३) ...

Arrested for stealing a car from Latur | मोटार चाेरणाऱ्या आराेपिंना लातुर येथून अटक

मोटार चाेरणाऱ्या आराेपिंना लातुर येथून अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी बसवराज चावरे (वय २३ रा. चऱ्होली बुद्रुक, ता. खेड), बालाजी बसवराज चावरे (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. त्यांची येरवाडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. गेल्या मंगळवारी (दि १९) वरिल आरोपींनी दुचाकीवरून येत मोटार चालकाला कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याकडून मोटार पळवली होती. या प्रकरणी म्हाळूंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शोध व प्रतिबंधक पथकाचे प्रमुख दत्तात्रय गुळीग व त्यांचे तपास पथक हे करीत होते. चोरट्यांनी मोटार लातूर येथे नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक लातुर येथे गेले. त्या ठिकाणी त्यांनी सापळा रचून आरोपिंना अटक केली आहे.

फोटो झायलो कार चोरून नेणाऱ्या चोरट्यास महाळुंगे पोलिसांनी गाडी सह अटक केली

Web Title: Arrested for stealing a car from Latur