चरस विक्रीसाठी आलेल्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:27 IST2020-11-26T04:27:23+5:302020-11-26T04:27:23+5:30

\Sलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चरस विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली़ ...

Arrested for selling hashish | चरस विक्रीसाठी आलेल्यास अटक

चरस विक्रीसाठी आलेल्यास अटक

\Sलोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : चरस विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली़

शहादाब सलीम खान (वय ३४, रा़ भाग्योदयनगर, कोंढवा) असे त्याचे नाव आहे़

पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, हवालदार उत्तरकर, शितोळे, गोडे पडवळ हे हडपसर परिसरात गस्त घालत होते़ यावेळी अंमलदार गाडे यांना माहिती मिळाली़ त्यानुसार पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी आझादनगर चौकाजवळ थांबलेल्या खान याला पकडले़ त्यांची झडती घेतली असता सॅकमध्ये ५३६ ग्रॅम चरस आढळून आला़ दुचाकीसह ३ लाख १८ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे़

Web Title: Arrested for selling hashish