Arrested for providing young girl for exports | एक्सॉर्टसाठी तरुणी पुरविणाऱ्यास अटक
एक्सॉर्टसाठी तरुणी पुरविणाऱ्यास अटक

ठळक मुद्देअधिक तपासासाठी ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर

पुणे : वेश्यागमनासाठी तरुणी पुरविण्याचे काम करणाऱ्या मुख्य सुत्रधाराला येरवडा पोलिसांनी एका तरुणीसह अटक केली आहे़. 
हेमंत प्राणाबंधु शाहु (वय २८, रा़ केसनंद फाटा, मुळे ओरिसा) असे या मुख्य सुत्रधाराचे आहे़. त्याचा साथीदार छोटू ऊर्फ राजू शाहु पळून गेला़. 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, येरवडा पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार बाळासाहेब बहिरट व त्यांचे साथीदार गस्त घालत असताना ग्राहकांना मागणीप्रमाणे वेश्यागमनासाठी तरुणी पुरविणारा नगर रोडवरील हयात चौकात येणार असल्याची माहिती मिळाली़. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी पहाटे हयात चौकात सापळा लावला़. तेव्हा चौकातील टायर दुकानाजवळ एक कार येऊन थांबली़. गाडीत दोन पुरुष व एक तरुणी होती़. पोलिसांनी दोघांना पकडले़ त्यावेळी राजू शाहु पळून गेला़. 
पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर हेमंत शाहु हा तरुणींना जादा पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायासाठी तयार करीत असत़. ग्राहकांना त्यांचे फोटो पाठवून त्यांच्या पसंतीप्रमाणे तो तरुणींना लॉजवर स्वत: घेऊन जात असे़. ग्राहकांकडून एका रात्रीचे ६ हजार रुपये घेत असल्याचे त्याने सांगितले़. 
त्यांच्याकडून दोन मोबाईल, कार व पर्स असा २ लाख १ हजार ५२० रुपयांचा माल जप्त केला आहे़. न्यायालयाने अधिक तपासासाठी ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे़.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक फौजदार बाळासाहेब बहिरट, हवालदार हनुमंत जाधव, सचिन रणदिवे, समीर भोरडे, सुनिल सकट, शरद दौंड, महिला पोलीस शिपाई गजरमल यांनी केली़. 

Web Title: Arrested for providing young girl for exports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.