अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्यास अटक; इंदापूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 15:25 IST2023-02-11T15:21:30+5:302023-02-11T15:25:02+5:30
इंदापूर ( पुणे ) : दहा वर्षांच्या मुलीबरोबर अश्लील चाळे केल्याच्या आरोपावरून बाभुळगाव (ता.इंदापूर) येथील एकाला अटक करण्यात आली ...

अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्यास अटक; इंदापूर तालुक्यातील घटना
इंदापूर (पुणे) : दहा वर्षांच्या मुलीबरोबर अश्लील चाळे केल्याच्या आरोपावरून बाभुळगाव (ता.इंदापूर) येथील एकाला अटक करण्यात आली आहे. अण्णा उर्फ बाबू कडाप्पा जाधव (वय ५५, रा.बाभुळगाव, ता.इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
गुरुवारी (दि. ९) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आरोपीने दहा वर्षांच्या मुलीला गावातील महादेवाच्या मंदिराजवळ असलेल्या ग्रामपंचायतीच्या बाथरूममध्ये नेले. तेथे तिच्याशी अश्लील चाळे केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार अपर्णा जाधव पुढील तपास करीत आहेत.