भाईचा बड्डे..! तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्याला अटक; लोणीकाळभोर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 16:44 IST2020-04-16T16:38:33+5:302020-04-16T16:44:14+5:30

व्हिडिओ क्लिप पोलिसांच्या हाती 

Arrested for celebrating a birthday by cutting a cake with a sword | भाईचा बड्डे..! तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्याला अटक; लोणीकाळभोर येथील घटना

भाईचा बड्डे..! तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्याला अटक; लोणीकाळभोर येथील घटना

ठळक मुद्देबेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. असे असताना काही जणांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले आहे. अशातच लोणीकाळभोर परिसरातील येथील एकाने तलवारीने केक कापुन वाढदिवस साजरा केल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे. 
 ॠषीकेश सुरेश पवार (वय २१,रा.कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर,ता.हवेली, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.त्याच्याविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या वाढदिवसाची ध्वनीचित्रफित पोलिसांच्या हाती लागताच त्याला पकडण्यात आले.त्याच्याकडून तलवारही जप्त करण्यात आली.पवार सराईत असून तो नेहमी दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्र बाळगतो.कदमवाक वस्ती एका तरुणाने सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून संचारबंदी वाढदिवस साजरा केल्याबाबतची ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. लोणीकाळभोर परिसरात या ध्वनीचित्रफितीची सध्या चर्चा सुरू होती.
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक या भागात गस्त घालत होते.पोलिसांनी ही ध्वनीचित्रफित पाहिली.संचारबंदीत केक कापणा-याचा शोध सुरू केला.तपासात सराईत गुन्हेगार पवारने संचारबंदीत भररस्त्यात तलवारीने केक  कापून वाढदिवस साजरा केल्याची माहिती मिळाली.त्यानंतर तो लोणीकाळभोर परिसरात फिरत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली.पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, सचिन गायकवाड, ज्ञानेश्वर क्षीरसागर, काशिनाथ राजापुरे यांनी त्याला सापळा लावून पकडले.

Web Title: Arrested for celebrating a birthday by cutting a cake with a sword