पिस्तुल बाळगणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST2021-01-08T04:28:59+5:302021-01-08T04:28:59+5:30

पुणे : बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल व एक ...

Arrested for carrying a pistol | पिस्तुल बाळगणाऱ्यास अटक

पिस्तुल बाळगणाऱ्यास अटक

पुणे : बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त केले.

प्रेम रामदिन बाबु (वय २०, रा. साई कृपा टी स्टॉल, मोर चौक, सुतारवाडी रोड, पाषाण ) असे अटक् केलेल्याचे नाव आहे. बाबु हा मुळचा उत्तर प्रदेशातील राहणार आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील ताकवले यांच्या पथकातील उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, सहायक उपनिरीक्षक सतीश भालेकर, पोलिस कर्मचारी इम्रान शेख, सचिन जाधव, शशीकांत दरेकर यांना एक मुलगा संत रोहिदास उद्यान परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मीरा हॉस्पिटलजवळील बोळ्यात उभ्या असलेल्या प्रेम बाबुला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तुल व एक जिवंत काडतूस सापडले. अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Arrested for carrying a pistol