शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

"अटक करा;अन्यथा गोळ्या घाला,पण काम बंद करा, त्यानंतरच चर्चा; भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा एल्गार"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 11:55 AM

भामा-आसखेड जलवाहिनीचे काम पाडले बंद 

ठळक मुद्देपॅकेज नाकारल्यानंतर व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा निष्फळ; जेल भरो आंदोलन

आसखेड : ‘अटक करा; अन्यथा गोळ्या घाला, पण काम बंद करा, त्यानंतरच चर्चा करा, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, आमचे आधी पुनर्वसन करा अशा घोषणा देत संतप्त आंदोलकांनी भामा-आसखेड जलवाहिनीचे काम बंद पाडले. पोलिसांनी सावध पवित्रा घेत आंदोलकांची धरपकड करत काम पुन्हा सुरू केले.  पॅकेज नाकारल्यानंतर तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर भामा-आसखेड प्रकल्पग्रस्थांनी सोमवारी जेल भरो आंदोलन करत जलवाहिनीचे काम बंद पाडले. पोलिसांनी आंदोलकांना अटक करत पुन्हा काम सुरू केले. करंजविहिरे, धामणेफाटा सगळ्या ठिकाणी नाकाबंदी करून आंदोलकांना पोलिसांनी थोपविले. त्यांना  विविध गाड्यांमध्ये भरण्यात आले. चाकणच्या दिशेने घेण्यात निघालेल्या गाड्यांची दिशा अचानक बदलून परत फिरवल्याने गाड्या थांबवून  आंदोलकांनी काम सुरू असलेल्या आसखेड फाट्याकडे पळ काढला. यामुळे पोलिसांची धांदल उडाली. आंदोलकांचा एक गट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यात यशस्वी ठरला. त्यांनी काम बंद पाडले. परंतु दुसरा गट आल्यानंतर त्यांना पोलिसांनी अलीकडेच थोपवले. यामुळे जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले.

 कोर्टाने आदेश देऊनही कित्येकांना जमिनीच्या बदल्यात जमिनी मिळाल्या नाही. आमचे पुनर्वसन केले नाही. ६५ टक्के रकमा भरणाऱ्यांनाही अद्याप जमिनी मिळाल्या नाही. शासनाला, पोलीस प्रशासनाला सहकार्य करूनही, शांततेत आंदोलन करूनही शासन आमची फसवणूक करीत आहे. आम्हाला कायदा हातात घ्यायला बाध्य करू नका; काम बंद झाल्यावरच आम्ही चर्चा करू, असे मत आंदोलकांच्या वतीने सत्यवान नवले यांनी मांडले.  या वेळी सहायक आयुक्त रामचंद्र जाधव, पोलीस निरीक्षक प्रकाश धस, प्रांताधिकारी संजय तेली यांनी आंदोलकांची समजूत काढली. परंतु काम बंद मगच चर्चा आणि आमच्या मागण्या पूर्ण करा तरच आंदोलन मागे घेण्यात येईल, असे आंदोलकांनी सांगितले.... आंदोलकांनी मारल्या पोलिसांच्या गाड्यांतून उड्यासकाळपासूनच आंदोलक आक्रमक होते. त्यांना थांबवण्यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. काही आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. मात्र, पोलिसांचा डाव ओळखून आंदोलकांनी पोलीस व्हॅनमधून उड्या मारत जलवाहिनीकडे धाव घेतली. दरम्यान, काही आंदोलक महिला व पुरुष काट्याकुट्यातून, आडमार्गाने शेतातून जलवाहिनीवर येऊन धडकले. ते जलवाहिनीच्या पाईपावर येऊन बसल्याने काम ठप्प झाले......  वृद्ध शेतकरी जखमीएक वयोवृद्ध शेतकरी गबाजी सातपुते यांनी आंदोलनादरम्यान धामणे घाटात पिंजरा गाडीतून उडी मारली. यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारKhedखेडagitationआंदोलन