लष्करात जानेवारीपर्यंत पदोन्नती होणार - बिपीन रावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 04:08 AM2017-12-02T04:08:58+5:302017-12-02T04:09:21+5:30

सात-आठ वर्षांपासून सैन्यातील कर्मचारी, सैनिक, नाईक, सुभेदार यांची पदोन्नती रखडलेली आहे. जानेवारी २०१८ पर्यंत सैन्यातील १ लाख ४०,००० कर्मचा-यांची पदोन्नती होणार असल्याची माहिती भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली.

 Army will be promoted till January - Bipin Rawat | लष्करात जानेवारीपर्यंत पदोन्नती होणार - बिपीन रावत

लष्करात जानेवारीपर्यंत पदोन्नती होणार - बिपीन रावत

Next

पुणे : सात-आठ वर्षांपासून सैन्यातील कर्मचारी, सैनिक, नाईक, सुभेदार यांची पदोन्नती रखडलेली आहे. जानेवारी २०१८ पर्यंत सैन्यातील १ लाख ४०,००० कर्मचा-यांची पदोन्नती होणार असल्याची माहिती भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली. सुभेदार मेजर पदासाठी ४५७ जागा भरल्या जाणार असून, ज्युनिअर कमांडिंग आॅफिसरच्या बढतीचे गेली दहा वर्षे प्रलंबित असलेले प्रकरण मार्गी लागले आहे, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक व पत्रकार नितीन गोखले यांनी लिहिलेल्या ‘सिक्युरिंग इंडिया द मोदी वे’ या पुस्तकाचे पुण्यात शुक्रवारी रावत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक, सैन्य दलाच्या दक्षिण मुख्यालयाचे जनरल आॅफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, नितीन गोखले आणि पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबने यावेळी उपस्थित होते.

आयव्हीआरएस प्रणाली
दुर्गम भागातील आजी-माजी सैनिकांचा पगार, पेन्शन, तसेच इतर आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी प्रिन्सिपल कंट्रोलर आॅफ डिफेन्स अकाऊंट विभागातर्फे इंट्रोव्हेटिव्ह व्हाईस रिस्पॉन्स (आयव्हीआरएस प्रणाली ) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास केला आहे. याद्वारे त्यांच्या आर्थिक अडचणी त्यांना या प्रणालीद्वारे आहे त्या ठिकाणावरून सोडवता येणार आहे. या प्रणालीचे उद्घाटनही लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते झाले.
या आयव्हीआरएस प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे ही सेवा इंटरनेट नसतानासुद्धा वापरता येणार आहे. फोनवरुन २४ तास या सेवेचा लाभ जवानांना घेता येणार आहे.

Web Title:  Army will be promoted till January - Bipin Rawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.