शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

दिल्लीतील मेजर ‘किलारी’ने २५ लाखांत ‘थिरु’ला विकली होती लष्कराची प्रश्नपत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 6:24 PM

लष्कर रिलेशन भरती पेपरफुटी प्रकरण: तिघांना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : दिल्लीतील मेजर वसंत किलारी याने तामिळनाडुतील मेजर थिरु थंगवेल याला २५ लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी तिघांना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. 

मेजर वसंत विजय किलारी (वय ४५, रा. दिल्ली, मुळ गाव आंध्र प्रदेश), मेजर थिरु मुरुगन थंगवेलु (वय ४७, रा. वेलिंग्टन, तामिळनाडु) आणि भारत लक्ष्मण अडकमोळ (वय ३७, रा. पाचोरा, जि. जळगाव) यांना येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केली. महेंद्र सोनवणे, अलीअख्तर खान हे एक्स सर्व्हिसमन तसेच आजाद खान हा सैन्यात कुक आहे. किशोर गिरी याला सैन्याची भरती परिक्षेची कार्यपद्धती माहिती आहे.

तो पुणे, बारामती, फलटण, वडुज, इस्लामपूर, भुईज, पुसेगाव, रहमतपूर, कराड, सोलापूर, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, बेळगाव या ठिकाणी रिक्रुटमेंट अ‍ॅकॅडमी चालवत आहे. तसेच त्याने फ्रेंचायजी दिल्या आहे.  परीक्षेचे पेपर परीक्षेच्या एक दिवसांपूर्वी देतो, असे सांगून किशोर गिरी त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये फी आकारतो.

भारत अडकमोळ याला मेजर थिरु थंगवेल याच्याकडून रिलेशन भरती प्रश्नपत्रिका व्हॉटसअ‍ॅपवर पाठविली होती. थिरु थंगवेल याला दिल्लीतील मेजर वसंत किलारी याने ती प्रश्नप्रत्रिका पाठविली होती. किलारी याला पवन नायडु याने ती पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पवन नायडु हा व्यावसायिक असून तो गुन्हा घडल्यापासून फरार आहे. त्याला लष्करातून ही प्रश्नपत्रिका कोणी पाठविली, त्याचा तपास सुरु आहे. परीक्षेला बसणार्‍या परिक्षार्थींकडून त्यांनी प्रत्येकी १ लाख रुपये घेतले आहेत. 

थिरु थंगवेलु याने आर्मी रिलेशन भरती प्रक्रिेयेच्या लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका देण्याच्या बदल्यात वसंत किलारी याला रोख २५ लाख रुपये देण्याच ठरले होते. त्यानुसार वसंत किलारी याने थिरु थंगवेल याला प्रश्नप्रत्रिका पाठविली. थिरु याने ती अडकमोळ याला पाठविली. अडकमोळ याने ती इतरांना पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वसंत किलारी याला पवन नायडु याने ही प्रश्नप्रत्रिका पाठविली होती. नायडु हा फरार असल्याने त्याला ही प्रश्नप्रत्रिका कोणी पाठविली होती, याचा शोध सुरु आहे. तपासादरम्यान, पुंडलीक सहाणे (रा. श्री ओम साई करीअर अ‍ॅकॅडमी, वडाची वाडी) व अरंविद चव्हाण (रा़ महाड) यांचाही त्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. अटक आरोपींशी त्यांनी संगनमत करुन हा गुन्हा केला आहे.

सातारा येथील एका प्रशिक्षार्थीने दिलेल्या फिर्यादीवरुन विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रशिणार्थीने दिलेल्या १ लाख रुपयांपैकी १० हजार रुपये महेंद्र सोनवणे याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित ९० हजार रुपये हस्तगत करायचे आहेत. न्यायालयाने तीनही आरोपींना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. 

पुणे पोलीस आर्मी रिलेशन परीक्षेतील पेपरफुटीच्या तपासात एक एक गुंता सोडवित प्रश्नपत्रिका सर्वप्रथम कोणी फोडली, या दिशेने जात आहे. त्यातूनच व्यावसायिक पवन नायडुपर्यंत धागेदोगे पोहचले असून त्याच्याकडे ही प्रश्नपत्रिका कोणी पाठवली, याचा शोध सुरु आहे. 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाfraudधोकेबाजीIndian Armyभारतीय जवानPoliceपोलिस