पुण्यात भाजपाच्या दोन गटात वादावादी; श्री शंकर महाराज मठातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:27 IST2024-06-20T16:26:40+5:302024-06-20T16:27:08+5:30
पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी येथील सद्गुरू श्री शंकर महाराज मठ हा शंकर बाबा भक्तांसह पुणेकरांचे श्रद्धास्थान आहे...

पुण्यात भाजपाच्या दोन गटात वादावादी; श्री शंकर महाराज मठातील घटना
पुणे : धनकवडी येथील सद्गुरू श्री शंकर महाराज मठात भाजपच्या दोन गटात वाद विवाद झाल्याची घटना गुरुवारी (दि. २०) सकाळी घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या संदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता, या बाबतीत कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचे म्हटले आहे. तर भाजपच्यावतीने भक्तांमध्ये काही वाद विवाद झाला असेल पण कार्यकर्त्यांमध्ये नाही असे सांगण्यात आले आहे.
पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी येथील सद्गुरू श्री शंकर महाराज मठ हा शंकर बाबा भक्तांसह पुणेकरांचे श्रद्धास्थान आहे. राज्यभरातून याठिकाणी लाखो भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने येत असतात. अशा पवित्र ठिकाणी अशा प्रकारचे वादविवाद आणि संघर्ष भूषणावह नसल्याचे भाविकांनी म्हटलं आहे.
पुण्यातील सद्गुरू श्री शंकर महाराज मठात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना#punepic.twitter.com/dXBXcrgSW6
— Lokmat (@lokmat) June 20, 2024