शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मनमानी पद्धतीने पैसे उकळणे; उद्धट वर्तन, आरटीओची १७४ रिक्षाचालकांवर कडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 11:59 IST

रिक्षाचालकांच्या काही तक्रारी असल्यास प्रवाशांनी आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि संबंधित रिक्षाचा फोटो ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा

पुणे: प्रवाशांकडून मीटरनुसार भाडे न आकारता मनमानी पद्धतीने पैसे उकळणे, जादा प्रवासी घेणे, भाडे नाकारणे, उद्धट वर्तन करणे तसेच ‘मीटर फास्ट’ ठेवणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणेने जानेवारी २०२६ मध्ये विशेष मोहीम राबवली. यामध्ये तब्बल ४७७ ऑटो रिक्षांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १७४ रिक्षाचालक नियमभंग करताना आढळले. दोषी आढळलेल्या चालकांवर कडक कारवाई करत सहा रिक्षाचालकांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच उर्वरित चालकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण ५५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तपासणीदरम्यान जादा भाडे आकारणाऱ्या २९ प्रकरणांची नोंद झाली. ‘मीटर फास्ट’ ठेवून प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या १० चालकांवर कारवाई करण्यात आली. जादा प्रवाशी घेणाऱ्या एक, भाडे नाकारणारे १०, उद्धट वर्तन करणारे १७ तसेच इतर विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचा समावेश असून, एकूण १७४ रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरात वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आरटीओने ही मोहीम हाती घेतली होती. कोणत्याही ऑटो रिक्षाचालकाने नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक तसेच परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल. जादा भाडे आकारणे, भाडे नाकारणे, मीटर फास्ट असणे किंवा उद्धट वर्तन करणे अशा तक्रारी असल्यास प्रवाशांनी आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि संबंधित रिक्षाचा फोटो ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा. प्राप्त तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली.

रिक्षावाले आकारतात अधिक भाडे 

सध्या ओला, उबेर या ॲपवरून रिक्षा बुक केल्यानंतर त्यात जे नियमानुसार भाडे आहे, ते सुरुवातीला दिसते. परंतु, जेव्हा रिक्षा घरासमोर येते, तेव्हा मात्र रिक्षावाले मीटरने भाडे आकारू, असे सांगतात. त्यावर ग्राहक आणि त्यांचा वाद होतो. जर मीटरवर भाडे आकारायचे असेल तर मग ॲपमधून बुकिंग कशाला केले जाते. यावर शहरभर वाद सुरू आहे. त्यामुळे याविषयी आरटीओने देखील लक्ष देऊन असे प्रकार होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune RTO Cracks Down on Errant Auto Drivers Extorting Passengers.

Web Summary : Pune RTO fined 174 auto drivers ₹55 lakh for overcharging, refusing fares, and rude behavior. Six licenses were suspended after a special drive in January 2026. Passengers can report issues via WhatsApp.
टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसauto rickshawऑटो रिक्षाMONEYपैसाpassengerप्रवासीSocialसामाजिक