जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निरीक्षकांच्या नियुक्त्या

By Admin | Updated: January 23, 2017 02:38 IST2017-01-23T02:38:07+5:302017-01-23T02:38:07+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नियमानुसार पार पडतात किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यासाठी

Appointments of observers for Zilla Parishad elections | जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निरीक्षकांच्या नियुक्त्या

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निरीक्षकांच्या नियुक्त्या

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नियमानुसार पार पडतात किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यासाठी चार निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक निरीक्षकाकडे तीन तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यासाठी चार अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जांच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यात, हवेली, पुरंदर आणि खेडचे निरीक्षक म्हणून अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांची, उपायुक्त पुनर्वसन दीपक नलवडे यांच्याकडे भोर, वेल्हा, मावळ आणि मुळशी आणि कोल्हापूर विभागीय जातपडताळणी समिती अध्यक्ष प्रकाश कदम यांची जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Appointments of observers for Zilla Parishad elections