शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: June 18, 2015 22:55 IST

सणसर (ता. इंदापूर) येथील शेतीच्या वादावरून झालेल्या मारहाणी प्रकरणी नितीन अशोक निंबाळकर, विश्वास मारुती निंबाळकर, मालोजी संभाजी गायकवाड

बारामती : सणसर (ता. इंदापूर) येथील शेतीच्या वादावरून झालेल्या मारहाणी प्रकरणी नितीन अशोक निंबाळकर, विश्वास मारुती निंबाळकर, मालोजी संभाजी गायकवाड, संकेत निंबाळकर व जगन्नाथ माने या ५ जणांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन आज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला.या प्रकरणात भवानीनगर पोलिसांनी नितीन निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून सूर्यकांत निंबाळकर, त्यांचा मुलगा तुषार निंबाळकर व पत्नी सुवर्णा निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या तिघांना अटक केली होती. इंदापूरच्या न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.दुसरीकडे सूर्यकांत निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून नितीन अशोक निंबाळकर, विश्वास मारुती निंबाळकर, मालोजी संभाजी गायकवाड, संकेत निंबाळकर व जगन्नाथ माने यांच्याविरोधात पोलिसांनी गज, तलवार, काठीने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी वरील पाच जणांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याची सुनावणी न्यायाधीश कदम यांच्यासमोर झाली. यामध्ये तलवार व गजाने डोक्यावर वार केलेले असल्याने गुन्हा गंभीर आहे व गुन्ह्यातील हत्यारे व वापरलेली वाहने जप्त करावयाची असल्याने अटकपूर्व जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकील अ‍ॅड. मनोहर चौधरी व अ‍ॅड. किशोर लोखंडे यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधिशांनी सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून पाच जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. (वार्ताहर)