शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

आंदेकर टोळीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; खंडणी, जमिनीचा ताबा घेतल्याचे उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 10:50 IST

जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्यानंतर पाच कोटी ४० लाख रुपयांचे भाडे खंडणी स्वरूपात उकळण्यात आले

पुणे : आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्यासह दोघांविरोधात खंडणी तसेच एकाच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्यानंतर पाच कोटी ४० लाख रुपयांचे भाडे खंडणी स्वरूपात उकळण्यात आले. तसेच, तक्रारदाराकडे जमिनीच्या नियोजित विकसनासाठी एक कोटी ८० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बंडू आदेकर, मनोज वर्देकर यांच्याविरोधात खंडणी वसूल करणे, त्यांच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी तक्रारदाराच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेऊन पाच कोटी ४० लाख रुपये भाडे स्वरूपात उकळले. जमिनीच्या नियोजित विकसनासाठी आरोपींनी एक कोटी ८० लाख रुपयांची खंडणी मागितली असल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत म्हटले आहे.आंदेकर टोळी गणेश पेठेतील मासळी बाजारातील विक्रेत्यांना धमकावून दरमहा हप्ता घेत होती. या टोळीने धमकावून खंडणी उकळली असल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर समर्थ पोलिस ठाण्यात तक्रारदाराने या टोळीविरोधात खंडणी, तसेच जमिनीची बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या टोळीने धमकावून अनेकांकडून खंडणी उकळल्याचा संशय आहे. आंदेकरच्या घरातून जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे जप्त करण्यात आली.

नाना पेठेतील टोळीयुद्ध तसेच माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली. आयुष हा बंडू आंदेकरचा नातू आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात गणेश कोमकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर बंडू आंदेकरने आयुषच्या खुनाचा कट रचला होता. या प्रकरणात आंदेकरसह १५ जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाने आंदेकरसह साथीदारांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Another case filed against Andekar gang for extortion, land grab.

Web Summary : Bapu Andekar and his accomplice face charges of extortion and illegal land seizure in Pune. They extorted ₹5.4 crore in rent and demanded ₹1.8 crore for development. Andekar is also accused of plotting a murder; he and 15 others are in jail.
टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPune Crimeपुणे क्राईम बातम्याCourtन्यायालय