भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 21:36 IST2021-08-28T21:36:03+5:302021-08-28T21:36:38+5:30

तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून धमकाविले

Another case filed against former BJP corporator Vivek Yadav | भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

पुणे : आपल्यावर जीवघेणा हल्ला केलेल्याची सुपारी देऊन पिस्तुले पुरविलेल्या व मोक्का अंतर्गत कारवाई केलेला भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

या प्रकरणी अकबर पिरसाब शेख (वय ३५, रा. पानसरेनगर, येवलेवाडी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विवेक यादव व त्याच्या ८ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कॅम्पमधील जान मोहम्मद स्ट्रीटवरील १५ ऑगस्ट चौकाजवळील कणसे गॅरेजसमोर ९ जानेवारी २०२० रोजी घडला होता.

अकबर शेख हा मोटारसायकलवरुन जात असताना आरोपी हे मोटारसायकलवरुन आले. त्यांनी त्यांची मोटारसायकल आडवी लावून शेख याला थांबायला भाग पाडले. विवेक यादव याने त्यांना शिवीगाळ करुन कंबरेला असलेला कोयता दाखवून तुला लय मस्ती आली आहे काय परत, विवेक भाईचे विरोधात अर्ज केला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती.

याबाबत फिर्यादी यांनी लष्कर पोलीस ठाणे व पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने पोलिसांनी फिर्यादी व आरोपी यांना समोरासमोर बोलावले होते. त्यामुळे आरोपीसमोर येण्यास घाबरल्यामुळे ते आले नाही व त्यांनी तक्रार दिली नव्हती. आता पोलिसांनी कारवाई केल्यानंतर ते तक्रार देण्यास पुढे आले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशावरुन विवेक यादव याच्यावर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे

Web Title: Another case filed against former BJP corporator Vivek Yadav