Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; तीन वाहनांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 18:59 IST2022-03-29T18:59:20+5:302022-03-29T18:59:41+5:30
मुंबई - बंगळुरु महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ घडणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; तीन वाहनांचे नुकसान
धायरी : मुंबई - बंगळुरु महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ घडणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास नवले पुलाजवळ विचित्र अपघात घडला. यामध्ये तीन वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने ह्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने निघालेला छोटा टेम्पोने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून आलेल्या कारची टेम्पोला धडक बसली. दरम्यान कारच्या पाठीमागे असणाऱ्या मोठ्या टेम्पोने कारला धडक दिली. दोन्ही टेम्पोच्यामध्ये अडकलेल्या कारचे मात्र या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने ह्यात कोणालाही गंभीर इजा झाली नाही. मुख्य रस्त्यावर अपघात झाल्याने थोड्या वेळाकरिता वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.