पुण्यातील चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत टोळक्याकडून 20 गाड्यांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 11:42 AM2023-04-18T11:42:58+5:302023-04-18T11:43:35+5:30

रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह 18 ते 20 जणांवर गुन्हे दाखल

Another 20 cars vandalized by gangs in Pune's Chatu:Shringi area | पुण्यातील चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत टोळक्याकडून 20 गाड्यांची तोडफोड

पुण्यातील चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत टोळक्याकडून 20 गाड्यांची तोडफोड

googlenewsNext

पुणे: पुण्यात सराईत गुन्हेगारांकडून पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत टोळक्याकडून 20 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह 18 ते 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वर्चस्ववादातून दोन गटात तुफान राडा  झाला. त्यावेळी सराईत गुन्हेगारांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यामध्ये 14 दुचाकी, 4 चारचाकी आणि एका तीनचाकी वाहनाचा समावेश आहे. दोन गटांमध्ये झालेल्या राड्यामध्ये लोखंडी हत्याराने वार केल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

Web Title: Another 20 cars vandalized by gangs in Pune's Chatu:Shringi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.