Akshaya Tritiya: श्री महालक्ष्मी देवीला मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 10:31 AM2022-05-03T10:31:38+5:302022-05-03T10:36:54+5:30

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागेच्यावतीने आयोजन

Anointing of Goddess Mahalakshmi with fragrant flowers including Mogra | Akshaya Tritiya: श्री महालक्ष्मी देवीला मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक

Akshaya Tritiya: श्री महालक्ष्मी देवीला मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक

googlenewsNext

पुणे : मोग-यासह सुवासिक फुलांचा श्री महालक्ष्मी देवीला घातलेला पोशाख... श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीचे पुष्पाभिषेक केल्यानंतर दिसणारे विलोभनीय रुप... मंदिराचा गाभारा व सभामंडपातील विविधरंगी पुष्पांची आरास पाहण्याकरीता देवीभक्तींनी गर्दी केली. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मोग-याच्या हजारो फुलांचा सुगंध दरवळत होता. यावेळी आंबा महोत्सव देखील साजरा करण्यात आला.
 
निमित्त होते, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने अक्षयतृतीयेच्या निमित्ताने वासंतिक मोगरा व आंबा महोत्सवाचे. मोग-याच्या फुलांनी मंदिराचा परिसर खुलून गेला होता. तब्बल १५१ किलो मोगरा, २५१ गुलाबाच्या फुलांच्या गड्डया, चाफा, जाई-जुई, गुलछडी, झेंडू यांसह अनेक फुलांची आरास करण्यात आली. तसेच मंदिरात आंबा महोत्सव देखील साजरा करण्यात आला. तब्बल २ हजार आंब्याचा महानैवेद्य देवीला दाखविण्यात आला होता. श्री महालक्ष्मी देवीसह श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीसमोर आंब्याचा महानैवेद्य दाखविण्यात आला. फुलांची आरास आणि आंबा महोत्सव पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. सामाजिक संस्थांना आंबे प्रसाद म्हणून देणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.  

Web Title: Anointing of Goddess Mahalakshmi with fragrant flowers including Mogra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.